'ऐका हो, शनिवारवाडा भाड्याने देणे आहे'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रातील इतिहासाचे साक्षर असलेल्या या गड-किल्ल्यांना हात  लावण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रातील जनतेचा हात सरकारवर पडल्याशिवाय राहणार नाही.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय भाजप सरकारच्यावतीने घेण्यात आला. या चुकीच्या निर्णयाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'शनिवारवाडा भाड्याने देणे आहे,' असे अभिनव पद्धतीचे आंदोलन आज (शनिवार) शनिवारवाड्याबाहेर करण्यात आले. 

- Chandrayaan 2 दक्षिण ध्रुवावर झेंडा गाडणारा भारत पहिलाच!

यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले, ''तुम्ही वर्ग 2 चे किल्ले भाड्याने देणार असे म्हणत आहात. शनिवारवाडा हा तर किल्ला पण नाहीये. त्यामुळे पुढील काळात जर आपण शनिवारवाडा भाड्याने द्यायला काढला, तर त्यासाठीचे एजंट शुल्क व पार्किंग शुल्क मुख्यमंत्री, पालकमंत्री, पर्यटनमंत्री यांनी घ्यावे. भाजप सरकारने हा तुघलकी निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा, त्यांना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

''महाराष्ट्रातील इतिहासाचे साक्षर असलेल्या या गड-किल्ल्यांना हात  लावण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रातील जनतेचा हात सरकारवर पडल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय लवकरात लवकर मागे घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल,'' असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

- तुमच्यासाठी बांगड्या पाठवू का?

आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, पक्षनेते दिलीप बराटे, प्रशांत जगताप, रविकांत वरपे, प्रदीप देशमुख, वनराज आंदेकर, काका चव्हाण, राकेश कामठे, महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, महेश हांडे, बापू डाकले, श्रीकांत पाटील, गणेश नलावडे, राजेंद्र खांदवे, मनोज पाचपुते, फहीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Pune city agitate at Shaniwar Wada