Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंचे बालाजीनगरमध्ये पदयात्रेत शक्तीप्रदर्शन 

sachin-dodake.jpg
sachin-dodake.jpg

 Vidhan Sabha 2019 : वारजे : खडकवासला मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन दोडके यांनी आज बालाजी नगर व बिबवेवाडी परिसरात पदयात्रा काढली. शेकडो नागरिक व महिला उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. 

''सचिन आला रे आला'' या घोषाणांनी येथील परिसर दुमदुमला. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवून दिली. चैत्रबन सोसायटी, लेक टाऊन सोसायटी,  राजीव गांधी नगर, अप्पर डेपो, बालाजी नगर या भागात जाऊन दोडके यांनी नागरिकांशी संवाद साधला. 

यावेळी नगरसेवक प्रकाश कदम, प्रतिक कदम, काका पायगुडे, गणेश मोहिते, आप्पा काळे, श्रीकांत जाधव, बबन दिघे  व असंख्य नागरिक  या पदयात्रेत सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com