राष्ट्रवादी कॉंग्रेसला लवकरच मोठा धक्का बसेल - चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक मोठे कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छूक असून लवकरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला.
chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankulesakal
Summary

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक मोठे कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छूक असून लवकरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला.

शिरूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक मोठे कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छूक असून लवकरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला. मोठ्या कार्यकर्त्यांच्या नावाची ही यादी खूप मोठी असून, लवकरच ही नावे समोर येणार असल्याने राष्ट्रवादीचे भविष्य अंधःकारमय आहे, असेही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे महागणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते महागणपती मंदिरात आरती झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने विश्वस्त डॉ. संतोष दुंडे यांनी त्यांचा सन्मान केला. मंदिराबाहेर त्यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी काही वेळ चर्चा केली. भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, युवा नेते राजेंद्र कोरेकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या सहप्रदेशाध्यक्षा रेश्मा शेख, भाजपचे तालुका सरचिटणीस ज्ञानदेव भैरट, आंबेगाव विभागाचे अध्यक्ष सतिश पाचंगे, तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा वैजयंती चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, भाजप अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत सातपुते, तालुकाध्यक्ष दिलीप शेलार, शिरूर शहर अध्यक्ष कौस्तुभ उबाळे, भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब खळदकर, आंबेगाव विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर साकोरे, किसन बिडगर, हर्षद जाधव, राजेश लांडे, डाॅ. राजेंद्र ढमढेरे, विजय नरके, प्रमोद गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे यांनी रांजणगाव एमआयडीसीतील समस्या व माथाडी कामगारांच्या समस्यांबाबतचे निवेदन बावनकुळे यांना यावेळी दिले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जनतेचा नव्हे तर नेत्यांचा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे अनेक बडे कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. ते गेले की पक्ष संपला. नेता गेला की त्या पक्षाचे अस्तित्व संपल्यातच जमा आहे. भाजपचे तसे नाही. भाजप हा विचारावर आधारीत सामान्यांचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षे ज्या पद्धतीने जनताभिमूख सरकार चालविले त्यावरून त्यांची लोकप्रियता वाढली असून, सामान्यांचा त्यांच्यावरील विश्वास या आठ वर्षांत आणखी दृढ झाला आहे. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबाबत मी बोलू शकत नाही. ते भाजपमध्ये येणार कींवा कसे हे तेच सांगू शकतील, असेही बावनकुळे म्हणाले.

कॉंग्रेस हे बुडते जहाज आहे. त्यामुळे या बुडत्या जहाजात आता कुणीही बसले तरी ते या जहाजाला वाचवू शकत नाही ही वस्तूस्थिती असल्याचे नमूद करून बावनकुळे म्हणाले, ५५ वर्षे केंद्र सरकार चालविणाऱ्या कॉंग्रेसने ज्या पद्धतीने देशाचा विकास करायला हवा होता, देशाला जी उंची मिळवून द्यायला हवी होती. ती देण्यात त्यांना अपयश आले. जगातील इतर देशांच्या तूलनेत जो विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. त्याचा परिणाम म्हणूनच आठ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजपचे सरकार स्थापन झाले आणि ते दिवसागणित आणखी मजबूत होत चालले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवरील फोटो हे, गेली अडीच वर्षे राज्याची सत्ता राष्ट्रवादीच्याच ताब्यात होती याचे द्योतक आहे. उद्धव ठाकरे हे नामधारी मुख्यमंत्री होती. तसेही त्यांना राज्य चालविता आले नाही. अडीच वर्षे राष्ट्रवादीनेच सरकार चालविले. सरकारवर पूर्ण ताबा त्यांचा असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना काही कळूच दिले नाही.

- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com