"राष्ट्रवादीलाच मिळेल स्पष्ट बहुमत' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पुणे - ""मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकडे पाठ फिरवून पुणेकरांनी आपला कौल जाहीर केला असून, गेली दहा वर्षे शहराचा सर्वांगीण विकास केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच स्पष्ट बहुमत मिळेल,'' असा दावा शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी पक्षाची भूमिका मांडत पुणेकर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशी राहतील, असे स्पष्ट केले. या वेळी महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाल्या, ""भारतीय जनता पक्षाने गुन्हेगारांना उमेदवारी दिली असून, हा पक्ष गुंडांच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहे. राज्य सरकारमधील मंत्रीही मतदारांवर दबाव आणत आहेत. मात्र, पुणेकर त्यांना थारा देणार नाहीत. शहराच्या विकासावरच आमच्या पक्षाला बहुमत मिळेल.'' 

दरम्यान, विकासाचा मुद्दा मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने प्रचारात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह माजी मंत्र्यांना प्रचारात उतरविले. पवार यांच्यासह विविध भागांत 12 जाहीर सभा घेण्यात आल्या; तसेच प्रत्येक घटकातील मतदारांच्या भेटीगाठी घेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.'' 

अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध भागांत "रोड शो' करीत पक्षाच्या उमेदवारांना मते देण्याचे आवाहन केले. पक्षाच्या "वॉर रूम'कडून प्रचारयंत्रणा राबविण्यात आली असून, "सोशल मीडिया'चा प्रभावीपणे वापर करण्यात आला. वंदना चव्हाण यांनी तरुण मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी त्यांचे मेळावे घेत मार्गदर्शन केले.

Web Title: NCP will get a clear majority