पुणे : मुंढव्यात 'जाऊबाई जोरात'; भाजपची धूळदाण

ज्ञानेश सावंत
शनिवार, 7 एप्रिल 2018

माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे ही निवडणूक झाली. त्यासाठी राष्ट्रवादीने कोद्रे यांच्या जाऊबाई पूजा यांना तर भाजपने सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेच्या मोनिका तुपे निवडणूक रिंगणात होत्या. या प्रभागातील एका जागेसाठी शुक्रवारी मतदान झाले. शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासून पूजा कोद्रे दीड हजार मतांनी आघाडीवर होत्या. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. 

पुणे : पुण्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतलेल्या मुंढव्यातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, या पक्षाच्या पूजा कोद्रेंनी विजयी मिळवून राष्ट्रवादीचा गड राखला. कोद्रे यांनी शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना 3 हजार 528 एवढ्या मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजपची जबरदस्त पिछेहाट झाली आहे. येथील भाजपच्या सुकन्या गायकवाड यांना तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली. शिवसेने चांगली मते मिळाली. या निकालामुळे हपसरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. 

या निवडणुकीत कोद्रे यांना 8 हजार 991 मते मिळाली. तर शिवसेनेच्या मुसंडी मारली असून, त्यांना 5 हजार 479 मते मिळविली. तर गायकवाड यांना 4 हजार 334 मतांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत गायकवाड यांना 11 हजार 400 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या विजयापेक्षा भाजपची घटलेली मते हे या निवडणुकीचे वैशिष्टय ठरले आहे. 

माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे ही निवडणूक झाली. त्यासाठी राष्ट्रवादीने कोद्रे यांच्या जाऊबाई पूजा यांना तर भाजपने सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेच्या मोनिका तुपे निवडणूक रिंगणात होत्या. या प्रभागातील एका जागेसाठी शुक्रवारी मतदान झाले. शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासून पूजा कोद्रे दीड हजार मतांनी आघाडीवर होत्या. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. 

मुंढवा-मगरपट्‌टासिटी या भागातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीने प्रभावी प्रचार यंत्रणा उभारली होती. तर राष्ट्रवादीला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धूळ चारून ही जागा ताब्यता घेण्याची भाजपची रणनीती होती. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभागातील राजकीय वातावरण तापले होते. परिणामी, या निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. 
पहिल्या फेरीत कोद्रे यांना 3 हजार 503 मते मिळाली. तेव्हा गायकवाड यांना 1 हजार 700 मते मिळाली होती. तुपे तिसऱ्या क्रमांकावर होत्या. 

Web Title: NCP wins bypoll in Pune Municipal Corporation