राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मातोश्रीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

बारामती : धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेचे आमदार विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. चौंडी येथे दगडफेकीत धनगर समाजाच्या युवकांविरुध्द लावलेले 307 कलम मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु अशी ग्वाही शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दिली. या प्रकरणात सहभागी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांच्यासह काही युवकांनी आज मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळेस ठाकरे यांनी ही ग्वाही दिली. 

चौंडी येथील प्रकारात धनगर समाजाच्या युवकांवर पोलिसांनी आकस ठेवून थेट 307 कलमान्वये कारवाई करुन महिनाभर तुरुंगात डांबले होते. हा अन्याय असल्याचे किशोर मासाळ व सहकाऱ्यांनी सविस्तरपणे उध्दव ठाकरे यांच्या कानावर घातले. या प्रकरणी धनगर समाजाच्या युवकांची मुस्कटदाबी होत असल्यास सेना युवकांच्या पाठीशी असेल, येत्या अधिवेशनात सेना आमदार धनगर आरक्षणाबाबत विधीमंडळात आवाज उठवतिल, असेही ठाकरे म्हणाले. 

किशोर मासाळ, सुरज खोमणे, अॅड. संतोष तावरे, राजन कोळेकर, अनिल मासाळ, संदीप मासाळ, नितीन मासाळ यांचा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री मुंबई येथे सत्कार करण्यात आला. धनगर आरक्षणाच्या मुद्यांवर पक्षभेद विसरुन आम्ही समाजाच्या पाठीशी राहू अशी ग्वाही उध्दव ठाकरे यांनी दिल्याचे मासाळ यांनी सांगितले. 
यावेळी शिवसेना सचिव अनील देसाई, धनगर समाज संघर्ष समितीचे सुरेश कांबळे, काकासाहेब मारकड, बालाप्रसाद किसवे, भगतसिंग विरकर, डॉ. प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.

Web Title: NCP Yout leader went in Matoshri