पालखी सोहळ्यातील वैष्णवांची सेवा करण्याचे राष्ट्रवादीचे आवाहन

राजकुमार थोरात
रविवार, 24 जून 2018

वालचंदनगर : जुलै महिन्यात संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव यांच्यासह अनेक संताचे पालखी सोहळे पुणे जिल्हातुन पंढरपूरकडे प्रस्थान करतात. पुणे जिल्हातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन वैष्णवांची सेवा करण्याचे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नुतन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले आहे.

गारटकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. जुलै महिन्यातील पालखी सोहळे हे महाराष्ट्रामधील सर्वांत मोठा उत्सव असतो. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत सोपानदेव यांच्यासह शेकडो संताच्या पालख्या पंढरपूरकडे जुलै महिन्यामध्ये रवाना होत आहे. यातील बहुतांश पालखी सोहळे हे पुणे जिल्हातुन पंढरपूरकडे जात असतात. लाखो वारकऱ्यांची गर्दी पालखी सोहळ्यामध्ये असते. यामध्ये शेतकरी वर्गाचे प्रमाण जास्त असते.

लाखो वैष्णव शिस्तीने पंढरपूरकडे आगेकुच करीत असतात. ज्या गावामधून पालखी सोहळे जाणार आहेत. त्या गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. तसेच पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अन्नदान, निवासाची सोय, मोफत औषध उपचार, पिण्याच्या पाण्याची सोय, व इतर शक्य असतील त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन गारटकर यांनी केले आहे.  

Web Title: NCP's appeal to serve in Palkhi Sohala