राष्ट्रवादीच्या प्रचारात विकासकामांवर भर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

वडगाव शेरी - ‘‘राष्ट्रवादी पक्षामुळे गांधीनगर, विमाननगर आणि सोमनाथनगरचा चेहरामोहरा बदलला. यामुळे येथील जनता राष्ट्रवादीलाच विजयी करेल. तसेच स्वार्थासाठी पक्ष बदलून जातीयवादी पक्षात गेलेल्या संधिसाधूंना जनता त्यांची जागा दाखवेल,’’ अशा शब्दांत माजी आमदार बापू पठारे यांनी गांधीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. पक्षाने केलेल्या कामांवरच प्रचारात भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विमाननगर-सोमनाथनगर (प्रभाग ३) मधील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश आढाव, उषा कळमकर, आनंद सरवदे, सुरेखा खांदवे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमास विल्सन राघुवेलू, नौशादभाऊ शेख, आनंद इंगळे, तुकाराम गवळी, रफीक पठाण, प्रा. महेंद्र कांबळे, बाळू शिंदे, विनोद मोरे, आयुब शेख, राहुल गायकवाड, फिरोज खान, डॉ. उल्हास औटी, पुंडलिक लव्हे, मीनल सरवदे आदी उपस्थित होते. गांधीनगरमधील गणेश मंदिरात बापू पठारे, बेबीताई आदमाने यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरवात झाली. प्रचारसभेचे वैशिष्ट्य म्हणजे गांधीनगरमधील महिला आणि बेरोजगार तरुणांनी व्यासपीठावर येऊन आपली कैफियत मांडली. तसेच वीस वर्षे सत्ता भोगूनही गांधीनगरमधील तरुणांना रोजगार मिळाला नाही. येथे अवैध धंद्यांचा विळखा पडला. वस्तीचा सातबारा बनवून देण्याचे आश्वासन देऊन नागरिकांची फसवणूक केलेल्या राजकीय पुढाऱ्यांना नाकारण्याचे आवाहन केले. 

माजी आमदार पठारे म्हणाले, ‘‘काही लोक ज्यांचे सरकार असेल त्या पक्षात जातात. साधी राहणीमान असल्याचा देखावा करून शेकडो एकर जमिनीची मालमत्ता कशी जमवली, हे जनतेने माहिती करून घ्यावे.’’ रमेश आढाव म्हणाले, ‘‘उच्चशिक्षित उमेदवार आणि सर्वधर्मसमभाव धोरण ही राष्ट्रवादीची ताकद आहे. जातीयवादी पक्षांमध्ये स्वार्थासाठी जाऊन बहुजनांचा विश्वासघात केलेल्यांना जनता पराभूत करेल.’’

Web Title: NCP's campaign emphasis on development work