राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे पाणी टंचाईच्या विरोधात आंदोलन

pimpari
pimpari

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र अपुरा पाणीपुरवठ्याची समस्या गेल्या पंधरवड्यात भेडसावू लागल्याने नगरसेवक आक्रमक झाले आहेत. ‘पाणी चोर पाणी चोर, भाजप सरकार पाणी चोर‘, ‘महापौर पाणी द्या पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा,‘ ‘पाणी संकट कोणामुळे, भाजपमुळे भाजपमुळे‘ अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिक भवन शनिवारी दुपारी सर्वसाधारण सभेपूर्वी दणाणून सोडले. शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक यांनीही पाणी टंचाईच्या विरोधात आंदोलन केले. त्या पक्षांचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हंडे, तांबे घेऊन काही नगरसेविकांनी आंदोलनात सहभाग घेतला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहूल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनीही आंदोलनात भाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com