राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात महिला पदाधिका-यांची कुचंबणा

मिलिंद संगई
रविवार, 3 जून 2018

बारामती :  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच मोठ्या कार्यक्रमात महिला पदाधिका-यांची कमालीची कुचंबणा होत असूनही पुरुष कार्यकर्त्यांची दादागिरी मात्र कमी होत नसल्याची झलक आजही पाहायला मिळाली. 

बारामती :  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच मोठ्या कार्यक्रमात महिला पदाधिका-यांची कमालीची कुचंबणा होत असूनही पुरुष कार्यकर्त्यांची दादागिरी मात्र कमी होत नसल्याची झलक आजही पाहायला मिळाली. 

बारामतीत आज अजित पवार यांच्या उपस्थितीत दूध संघाच्या कार्यालयात पक्षाचा मेळावा झाला. या मेळाव्याला नेहमीप्रमाणे अजित पवार यांना तोंड दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. मुळातच लहान व्यासपीठ असतानाही व्यासपीठावर अजित पवारांच्या जवळ बसण्याच्या अट्टाहासापायी अनेक कार्यकर्त्यांनीही पदाधिका-यांना मागे ढकलत व्यासपीठावरची जागा बळकावली. यात प्रमुख महिला पदाधिका-यांची मात्र चांगलीच कुचंबणा झाली. कमालीचा उकाडा, गर्दी व रेटारेटी या मुळे महिला पदाधिका-यांना अक्षरशः अंग चोरुन बसावे लागले. महिला पदाधिका-यांना व्यवस्थित बसता येत नाही हे दिसत असूनही कोणीही त्यांना जागा करुन देणे तर दूरच उलट त्यांना अडचण निर्माण करण्याचाच प्रयत्न केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सर्वप्रथम महिला धोरण राबवित महिलांना आरक्षण देत सत्तेत सहभागी करुन घेतले आणि आता समान सहभागाची संधी दिली, मात्र बारामतीतच राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-यांना व्यासपीठावर व्यवस्थित बसताही येत नाही हे चित्र वारंवार दिसते. आजच्या मेळाव्या दरम्यान तर पुरुषांची दादागिरी इतकी होती की अनेक प्रमुख महिला पदाधिकारी व्यासपीठावरुन निघून जाण्याच्या मनःस्थितीत होत्या. मात्र पक्षशिस्तीच्या बंधनामुळे त्यांनी नाइलाजाने या बाबत भूमिका घेतली नाही. महिला पदाधिका-यांनाही व्यासपीठावर समान संधी मिळायला हवी अशी त्यांची मागणी आहे. 

 

Web Title: ncp's female officials neglected in program