पुण्यातील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यी उपाशी; राष्ट्रवादीचे आंदोलन 

pune.jpg
pune.jpg

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज महानगरपालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी विरोधात आंदोलन करण्यात आले.

 राष्ट्रवादी  विद्यार्थ्यांना साडेतीन हजार रुपये अनुदान देण्यात यावे व बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज करावी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा नीट पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. 

याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अशी आहे.ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वसतिगृह बांधले आहे, तेथील विद्यार्थ्यांवर अशी वेळ येणे दुर्दैवी आहे. त्यांना त्या ठिकाणी अमानवी अशी वागणूक मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत. परंतु, महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वसतिगृह आहे, याची तरी लाज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे असा संताप त्यांनी व्यक्त केला. 

विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले की, या घटनेची चौकशी करून जबाबदार आधिकाऱ्यांवर कारवाई करावी. विद्यार्थ्याना जेवण न मिळणे यासारखी लाजीरवाणी बाब नाही. सत्ताधाऱ्यांना फक्त भ्रष्ट्राचार करण्यास वेळ आहे, महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष चाललेले आहे. या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करतो. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक अशोक कांबळे,योगेश ससाणे,समन्वयक राकेश कामठे, युवक अध्यक्ष महेश हांडे, विद्यार्थी अध्यक्ष विशाल मोरे, विक्रम जाधव, अच्युत लांडगे, चेतन शिवले, सवेंदू शिंदे, शुभम माताळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com