नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्याची घोषणा देत राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात शिवस्वराज्यची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवनेरीवर उपस्थित होते.

पिंपरी : नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्याची घोषणा देत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन (ता.जुन्नर,जि.पुणे) त्यांचा आशिर्वाद मागून आज करण्यात आली.

ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात शिवस्वराज्यची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवनेरीवर उपस्थित होते. यावेळी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गडावरील देवीची पुजा व आरती करत नव्या यात्रेची सुरुवात करण्यात आली. 

भाजप- शिवसेना सरकारच्या विरोधात पदयात्रा, हल्लाबोल आणि परिवर्तन यात्रा यशस्वीपणे काढल्यानंतर राष्ट्रवादीने या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात शिवनेरीवरुन विरोधाची तुतारी आज फुंकली. ती ६ ते २८ दरम्यान राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावर २८ ऑगस्टला होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCPs Shivswarajya yatra begins at Junnar