'पुणे जिह्यातील राष्ट्रवादीचे सहा आमदार शरद पवारांच्या पाठीशी'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- जिल्ह्यात अजित पवार पडले एकटे

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील केवळ अजित पवार यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातपैकी सहा आमदार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. या सहाही आमदारांनी शनिवारी दुपारी पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार हे राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये अजित पवार एकाकी पडले आहेत.

 ... अन् सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'इंशा-अल्लाह!'

राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहिलेल्यांमध्ये आंबेगावचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिरूरचे आमदार अशोक पवार, इंदापूरचे दत्तात्रेय भरणे, जुन्नरचे अतुल बेनके आणि मावळचे सुनील शेळके यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCPs Six MLAs of Pune District are with Sharad Pawar