देशसेवेलाच धर्म माना : राष्ट्रपती कोविंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - तुम्ही आता युवकांचे आदर्श, देशाचे संरक्षक बनला आहात. सेवा परमो धर्म: हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) ब्रीदवाक्‍य आहे. ते तुमच्या हृदयात कोरून ठेवा व आयुष्यात आणि देशसेवेसाठी त्याचा अवलंब करा, असा सल्ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छात्रांना दिला.

पुणे - तुम्ही आता युवकांचे आदर्श, देशाचे संरक्षक बनला आहात. सेवा परमो धर्म: हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) ब्रीदवाक्‍य आहे. ते तुमच्या हृदयात कोरून ठेवा व आयुष्यात आणि देशसेवेसाठी त्याचा अवलंब करा, असा सल्ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छात्रांना दिला.

‘एनडीए’ चा १३४ वा दीक्षान्त संचलन सोहळा राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थित पार पडला. शिस्तबंध आणि दिमाखदार संचलन तसेच छात्रसैनिकांची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी छात्रांना उद्देशून भाषण केले. प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल आयपी विपिन, डेप्युटी कमांडंट एस. के. ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्‍ला, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.  

अक्षत राज हा छात्र सर्वोत्तम ठरला. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला सुवर्णपदक देण्यात आले. महंमद सोहेल इस्लाम याला रौप्य, तर अली अहमद चौधरी याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. ‘के’ ही स्क्वाड्रन सर्वोत्तम ठरली. त्यांना चिफ्स ऑफ स्टाफ बॅनर देण्यात आले.

सकाळी सात वाजता बिगुल वाजवून या सोहळ्यास सुरवात करण्यात आली. सव्वासातच्या सुमारास राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर चेतक हेलिकॉप्टरने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी वाहनातून संचलनाची पाहणी केली. नंतर लष्कर आणि हवाईदलाच्या बॅंड वादनाच्या तालावर छात्रांबरोबर सुखोई विमानांनीही राष्ट्रपतींना मानवंदना दिली.

विविधतेत एकता
छात्रांच्या दिमाखदार संचलनास राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणातून दाद दिली. देशाच्या सुरक्षा दलांच्या वैभवाची आणि अभिमानाची साक्ष यातून दिसली. या संचलनात भारताच्या विविध राज्यांतील आणि विविध समाजांतील छात्रांचा समावेश आहे. त्यामुळे संचलनातून एकात्मता आणि विविधतेत एकता प्रतिबिंबित झाली आहे, असे ते म्हणाले. 

वैभवशाली परंपरेला धक्का  
‘एनडीए’ चे दीक्षान्त संचलन ही वैभवशाली परंपरा आहे. सामान्य नागरिकांना त्याबद्दल कुतूहल असते. त्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिक दरवर्षी गर्दी करतात. माध्यमांद्वारे संचलनाची परंपरा समाजासमोर आणली जाते. यावर्षी मात्र प्रबोधिनीचे जनसंपर्क अधिकारी अंशुमन अंशू यांनीच त्यात अडथळे निर्माण केले. संचलनाची छायाचित्रे टिपताना, चित्रीकरण त्यांनी वारंवार अडथळा निर्माण केले. छायाचित्रे काढताना ते येऊन मध्येच उभे राहात होते. या प्रकाराबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी डेप्युटी कमांडंट एस. के. ग्रेवाल यांच्याकडे त्याबद्दल तक्रार केली आहे.

Web Title: NDA convocation movement ceremony