लष्करात मराठी मुलांचे प्रमाण कमी; एनडीए टॉपरने व्यक्त केली खंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

लष्करात अधिकारी म्हणून मराठी मुलांची संख्या नेहमी कमी असते, याची मला खंत आहे. या क्षेत्रात संधी आणि उत्कृष्ट जीवनाच्या संधी असूनसुद्धा मराठी मुलांचे प्रमाण कमी दिसते.

पुणे : 'एनडीएच्या 137व्या तुकडीतील 285 विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. परंतु, यामध्ये राज्यातील केवळ 14 मुलांनी प्रशिक्षण घेतले. उत्तर भारतातील मुलांचा कल लष्कराच्या क्षेत्रात जास्त आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मात्र, मराठी मुले या प्रशिक्षण प्रणालीला कठीण मानतात आणि याच भीतीमुळे ते लष्करासारख्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. अनेक मुलांचा कल राज्यसेवेच्या परीक्षेकडे आहे,' असे मत एनडीएचा विद्यार्थी राहुल जालिंदर लाड याने व्यक्त केले. 

महाकाल (ता. जालना) या ग्रामीण भागातील राहुल लाड असून, त्याने अकरावी आणि बारावीचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी शाळेतून पूर्ण केले. नंतर एनडीएमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासून त्याला लष्कराची आवड होती. 

- सियाचीनमधील हिमस्खलनात दोन जवान हुतात्मा

राहुल म्हणाला, ''माझे वडील समर्थ कारखान्यात क्‍लर्क होते. परंतु, मला काही वेगळे करायचे होते. लष्कराची आवड असल्याने मी सैनिकी शाळेत प्रवेश आणि एनडीएत प्रवेश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. माझ्याबरोबरच्या सगळ्या विद्यार्थ्यांची निवड झाली. पण, मला शेवटच्या प्रयत्नात यश मिळाले. माझ्या परिवारातून लष्करात जाणारा मी पहिलाच आहे. आई-वडील माझे आदर्श असून, त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले.'' 

- VIDEO : 'रवी राणा का शपथ लेनेका स्टाईल थोडा अलग है रे बाबा,' एकदा पाहा तर..

लष्करात अधिकारी म्हणून मराठी मुलांची संख्या नेहमी कमी असते, याची मला खंत आहे. या क्षेत्रात संधी आणि उत्कृष्ट जीवनाच्या संधी असूनसुद्धा मराठी मुलांचे प्रमाण कमी दिसते. भविष्यात नौदलात प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी केरळातील नौदल अकादमीमध्ये पुढील प्रशिक्षण घेणार आहे, असे राहुल म्हणाला. 

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'

प्रशिक्षणाचा भाग कठीण आहे. परंतु, संधी दवडणे अयोग्य आहे. मराठी मुलांनी लष्करात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. अधिकारी पद मिळवून देशाचे नाव मोठे करावे. मी जेव्हा लष्करात जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आई-वडिलांनी आणि मित्रांनी मला खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे आज मी यशस्वी झालो आहे. 
- प्रसाद कोहिनकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDA topper Rahul Lad says the proportion of Marathi children in the military is low