शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचा अवलंब करण्याची गरज : वैभव घरत

दत्ता म्हसकर
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

जुन्नर : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब केल्यास वाकडी नजर करणाऱ्या शत्रू राष्ट्रांना धडा शिकविता येईल.'' ,असे प्रतिपादन रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांनी केले. जिल्हा परिषद पुण व पंचायत समितीच्या जुन्नरच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित पोवाडा गायन कार्यक्रमात (आज शनिवार ता.१६) घरत बोलत होते. 

यावेळी घरत यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण, स्वराज्य निर्मितीची संकल्पना, छत्रपती संभाजी राजांचे स्वराज्य सरंक्षण कार्य, विविध पराक्रम व लढाईचे वर्णन, तरुणांची देशाच्या विकासासाठी असणारी जबाबदारी, गड संवर्धन, पर्यावरण रक्षण, लेक वाचवा लेक शिकवा, स्त्री भ्रूण हत्या आदी विषय शाहिरीच्या माध्यमातून मांडून उपस्थितीतांना प्रभावित केले. शाहिरी कलेतून लेक वाचवा या विषयावर सादर केलेल्या कवणाने शिवप्रेमींचे मन हेलावून टाकले. गटविकास अधिकारी विकास दांगट यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन घरत यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी पंचायत समिती सदस्य शाम माळी,सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, पशुधन अधिकारी डॉ. अविनाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश गोडे, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे, महिला बालविकास प्रकल्प, अधिकारी हरिभाऊ हाके शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कक्षाधिकारी रामचंद्र तळपे, के बी खोडदे, भरत गाडेकर, सतीश शिंदे, संतोष भुजबळ, नितीन शेंडे, मुकुंद नांगरे यांनी केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need to adopt Shivaji Maharaj's war strategy: Glory at home