esakal | दौंडकरांनो, आता बास झाले...कारवाईचा दंडुका उचलायलाच हवा 
sakal

बोलून बातमी शोधा

daund

नागरिकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव, प्रशासकीय यंत्रणांकडून कारवाईचा अभाव आणि बाहेरून येणाऱ्या लोकांची नोंद नसल्याने दौंड तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे.

दौंडकरांनो, आता बास झाले...कारवाईचा दंडुका उचलायलाच हवा 

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

 दौंड (पुणे) : नागरिकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव, प्रशासकीय यंत्रणांकडून कारवाईचा अभाव आणि बाहेरून येणाऱ्या लोकांची नोंद नसल्याने दौंड तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. तीन महिने अनेक सवलती देऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आता आदेशांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईची नितांत गरज निर्माण झाली आहे. दौंड तालुक्यात ६५ दिवसांत १८७ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १२० जण बरे झाले आहेत.

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते ३ जुलै या कालावधीत एकूण १८७ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्यामध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे ४५, गट क्रमांक पाचचे ५, इंडिन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १५ पोलिस व १२२ नागरिकांचा समावेश आहे. दौंड शहरात २५ मे ते २ जुलै या कालावधीत तीन महिलांसह एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

दौंड तालुक्यात नागरिकांकडून शारीरिक अंतर पाळले जात नाही. मास्क न घातल्याबद्दल दंड करूनही नागरिक विना मास्क हिंडत आहेत. सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छतेचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. दौंड शहरात सलग सहा दिवस कचरा उचलला गेला नाही. प्रतिबंधित क्षेत्रात आदेशांचा सर्वाधिक भंग केला जात आहे. कारवाईची भीती नसल्याने होम क्वारंटाइन नागरिक देखील तालुक्यात हिंडत आहे. 

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक

माहिती लपविणाऱ्यांवर कारवाईची गरज
एसआरपीएफ व आयआरबीचे पोलिस हे मुंबई येथे बंदोबस्त करून दौंडमध्ये परतल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली. १ जूनपासून लॅाकडाउन आणखी शिथिल झाल्यानंतर दौंड तालुक्यातून नोकरी, उद्योग व व्यवसायानिमित्त पुणे, पिंपरी चिंचवड, नगर, सोलापूर, सातारा व अन्य जिल्ह्यात दररोज जाणार्यांची संख्या वाढली असून, अनेकांना तेथून बाधा झाली आहे. बाहेरून येणारे व दौंड बाहेर जाणाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण नाही. बाधित रुग्ण त्यांचा प्रवासासंबंधी तपशील लपवत असल्याने त्यांना नेमकी कशी व कुठे बाधा झाली, याचा तपशील आरोग्य यंत्रणांना वारंवार मागणी करूनही मिळत नाही. परिणामी, या बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांचे नातेवाईक व मित्र देखील बाधित झाले आहेत. 
           
लग्न, अंत्यविधींना गर्दी 
दौंड शहर व तालुक्यात मागील महिन्याभरात पार पडलेल्या अनेक लग्न समारंभात प्रत्येकी २०० ते २५० नागरिकांनी हजेरी लावली आहे. कारवाईची भीती नसल्याने विवाह समारंभ, अंत्ययात्रा, दशक्रिया विधी आणि अन्य कार्यक्रमांमध्ये मंजूर संख्येच्या चारपट गर्दी होत आहे.  

loading image