कुटुंबातील संवाद वाढविण्याची गरज - अॅड. अपर्णा रामतीर्थकर

मिलिंद संधान
मंगळवार, 5 जून 2018

नवी सांगवी - " वाढत्या शहरीकणामुळे एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास होत असताना, माणसातील आपलेपणा बरोबर आपुलकीही लोप पावत चालली आहे. त्यामुळे माणसा माणसातील संवाद हरवत जाऊन मानसिक ताणतनाव वाढत आहे. " असे प्रतिपादन अॅड अपर्णा रामतीर्थकर यांनी पिंपळे सौदागर येथे केले. उन्नती सोशल फाऊंडेशन आणि श्रीइवेट्स यांच्या वतीने ' ऋणानुबंध ' या विषयावर आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले.

नवी सांगवी - " वाढत्या शहरीकणामुळे एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास होत असताना, माणसातील आपलेपणा बरोबर आपुलकीही लोप पावत चालली आहे. त्यामुळे माणसा माणसातील संवाद हरवत जाऊन मानसिक ताणतनाव वाढत आहे. " असे प्रतिपादन अॅड अपर्णा रामतीर्थकर यांनी पिंपळे सौदागर येथे केले. उन्नती सोशल फाऊंडेशन आणि श्रीइवेट्स यांच्या वतीने ' ऋणानुबंध ' या विषयावर आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उन्नती फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, पुरूषोत्तम पाटील, जगन्नाथ काटे, राहुल काटे, मल्हारी काटे यांच्यासह चैतन्य हास्य क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला अॅड रामतीर्थकर यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात केली. सौदागर सारख्या आय. टी. अभियंत्यांचे हब असलेल्या नगरीत उच्चशिक्षितांची मांदियाळी होत असली तरी 'शेजार' संस्कृती कालबाह्य ठरत असताना दिसते. ऐवढेच काय तर नवरा बायको या राजाराणीच्या संसारात स्वतःच्या मुलांबरोबरचाही संवाद हरवित चालल्याची खंत यावेळी सर्वच श्रोत्यांनी केली.

हाच धागा पकडून अॅड रामतीर्थकर म्हणाल्या, "विभक्त कुटुंब पध्दतीमुळे कौंटुबिक कलह वाढत आहेत. त्यामुळे ऋणानुबंध जपण्यास प्रत्येकाने एक पाऊल पुढे आले पाहिजे. घरातील जेष्ठांनी प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ करणे कमी करून लहानमोठ्यांसह सर्वांशीच एकत्र बसून चर्चा साधली पाहिजे. नियमित व्यायाम करून नातवंडासोबत मैत्री करून स्वतःच्या मनोरंजनाबरोबर कौटुंबिक जबाबदारीही हलकी होईल. 

Web Title: Need to increase family communication - Adv. Aparna Ramitarthkar