गरजू, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे - ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) यांनी गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मदत प्रकल्प हाती घेतला आहे. या निमित्ताने पुणे शहर परिसरातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना चांगले सुस्थितीतील शैक्षणिक साहित्य गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदत म्हणून देण्याचे आवाहन सकाळ सोशल फाउंडेशनने केले आहे.

पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, टोकयंत्र, कंपास बॉक्‍स, रंगसाहित्य, गोष्टीची पुस्तके, मराठी व इंग्रजी शब्दकोश, नकाशे, स्केचपेन, रंगीत खडू, लहान वह्या, फुलस्केप वह्या व इतर शैक्षणिक साहित्य नागरिकांना देता येईल. सोमवार (ता. २७) पासून ३ सप्टेंबरपर्यंत शाळा आपल्या विद्यार्थ्यांकडून हे शैक्षणिक साहित्य जमा करून घेतील. साहित्य संकलनासाठी शाळांमध्ये बॉक्‍स ठेवण्याची व्यवस्था ‘सकाळ’ कडून करण्यात येत आहे. हे शैक्षणिक साहित्य पुणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात येणार आहे.

सोशल फॉर ॲक्‍शन
पुणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे कुपोषण कमी करण्यासाठी सकाळ सोशल फाउंडेशनच्या ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये ‘पोषण परसबाग’ हा उपक्रम सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मदत प्रकल्प हाती घेतला आहे. यात जास्तीत जास्त शाळा, विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी शाळांनी राहुल गरड (८६०५०१७३६६) किंवा सुमीत जाधव (८३७८९९३४४६) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Needy Tribal Student Educational Help by Sakal Social Foundation