Neera Left Canal Committee
Neera Left Canal Committee

नीरा डावा कालव्याचे पाणी पेटण्याची चिन्हे

बारामती : नीरा डावा कालव्याचे बारामती व इंदापूर तालुक्याचे पाणी कमी करण्याच्या निर्णयाला तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनीही आज (रविवार) तीव्र विरोध केला. त्यामुळे नीरा डावा कालव्याचे पाणी पेटणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. बारामतीत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज झालेल्या बैठकीत नीरा डावा कालवा संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता. 20) आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून तालुक्यातील हजारो शेतकरी तहसिल कचेरीसमोर शांततामय मार्गाने निदर्शने करणार असून या वेळी तहसिलदारांना निवेदन दिले जाणार आहे. नीरा देवघर धरणातील नीरा डावा कालव्याच्या कार्यक्षेत्रावरील लाभधारकांचे त्यांच्या हक्काचे पाणी त्यांना न्याय पद्धतीने मिळायला हवे, या मागणीसाठी विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

वसंतराव घनवट, दीपक पांढरे व उद्धव मोरे या तीन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची तांत्रिक समिती या संदर्भात तीन दिवसात अभ्यास करून कच्ची माहिती बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देणार आहेत. त्यांच्या माहितीच्या आधारे राज्य शासनासह न्यायालय किंवा महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात लढा उभारण्यासाठी अभ्यास करुन दाद मागण्यासह प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी धरला.

सतीश काकडे, राजेंद्र ढवाण, मदनराव देवकाते, कुलभूषण कोकरे, बाबूराव चव्हाण, अँड. राजेंद्र काळे, अमरसिंह जगताप, अविनाश देवकाते, अविनाश गोफणे, अॅड. नितीन कदम, बाळासाहेब गवारे, भारत गावडे, बाळासाहेब वाबळे, राहुल तावरे, रामदास आटोळे, सुरेश खलाटे, संपतराव देवकाते, भीमराव भोसले, रविराज तावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

एकाच मागणीवर करणार आंदोलन
नीरा देवधर धरणातील बारामती इंदापूर व पुरंदर तालुक्याच्या वाट्याचे हक्काचे  पाणी आम्हाला समान न्याय वाटप पद्धतीने मिळायला हवे, या एकाच मागणीवर पुढील सर्व आंदोलन होईल, असेही या वेळी जाहीर केले गेले.

वरंधा घाटातून जाणारे पाणी भाटघरला वळवा
दरम्यान, वरंधा घाटानजीक असलेल्या गावातून दरवर्षी पावसाळ्यातून वाहून जाणारे पाणी अडीच कि.मी. लांबीचा बोगदा करुन भाटघरमध्ये आणले, तर 13 टीएमसी पाणी अतिरिक्त मिळू शकते, याचाही विचार करण्याचे आवाहन शासनाला करणार असल्याचे अॅड. राजेंद्र काळे यांनी सांगितले.

पक्षविरहित आंदोलन
हे आंदोलन शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून केले जाणार आहे, यात राजकारण किंवा पक्षाचा काहीही भाग नाही, असे कुलभूषण कोकरे व राजेंद्र काळे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com