'मी पुन्हा आलो' ट्रेंडींग: नेटकरी अॅक्टीव

सकाळा वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नेटकरी सकाळपासून अॅक्‍टीव झाले आहेत. राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत अनेक गमतीदार प्रतिक्रिया सोशल माध्यमावर उमटत आहेत.

काही निवडक पोस्ट :

मी पुन्हा आलो... मी पुन्हा आलो...दादाला पण घेऊन आलो.

आता हे सिद्ध झालंय की कुणालाही मतदान केल्यावर ते भाजपला जातंय.

सूत्र झोपेत असतानाच बारामती-नागपूरला समृद्ध करणारा मार्ग आखण्यात आला.

तो खरच आला की आणि ते ही घड्याळ्याच्या काट्यावर

पुण्याचे पालकमंत्री दादाच. पण कोणते ते अद्याप निश्‍चित नाहीत ः सूत्र

तेल गेलं अनं तूपही. हाती आल धुपाटनं.

शरद पवारांना समजून घेण्यासाठी संजय राऊत यांनाच शंभर वर्ष लागतील.

आज पहिल्यांदा असं वाटलं की किमान अजित पवारांच्या बंडखोरीत तरी शरद पवारांचा हात नसेल

Image may contain: text

रात्रीत साखरपुडा आणि पहाटे लग्न

शिखर बॅंक, सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचा काहीही संबंध नाही ः भाजप

घोटाळ्यांची चौकशी करणारा मुख्यमंत्री आणि घोटाळा करणारा उपमुख्यमंत्री

No photo description available.

मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. पण एवढ्या सकाळी सकाळी येताल हे नव्हतं माहीत.

शपथ विधी होता का दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी सकाळी आटोपला. 

आमच्या नरकचतुर्दशीच्या आंघोळी पण इतक्या पहाटे होत नाहीत
......ह्यांचा शपथविधी पण झाला.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens Are Active On Social Media after formation of maharashtra government