Pune Rains : पुण्याचा रोमँटिक पाऊस ठरतोय व्हिलन; सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

पुणेकरांसाठी कायम अल्हाददायक असणारा पाऊस गेल्या काही आठवड्यांपासून मनस्ताप ठरत मुसळधार पावसामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील आंबील ओढ्याला पूर आला होता. 

पुणे : राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात या पावसाचा जोर दिसत आहे. कमी वेळेत धो धो कोसळणाऱ्या या पावसामुळे शहारातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.

पुण्यात शनिवारी सायंकाळपासून पावसामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी पहायला मिळाली असून, नागरिकांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. 

ट्विटरवर शनिवारी संध्याकाळपासूनच #punerainsट्रेंड सुरू झाला होता. त्या हॅशटॅग खाली पुणेकरांनी पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यात काही मजेशीर जीआयएफ आहेत तर, काहींनी शहरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर रागाही व्यक्त केला आहे. काहींनी इतरांच्या सोयीसाठी शहरात कोण कोणत्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे हे सांगणारे गुगल मॅपचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. 

रोमँटिक पाऊस ठरतोय व्हिलन

पुणेकरांसाठी कायम अल्हाददायक असणारा पाऊस गेल्या काही आठवड्यांपासून मनस्ताप ठरत मुसळधार पावसामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील आंबील ओढ्याला पूर आला होता. त्या पुरात अनेक निष्पापांचा बळी गेला.

शहरातील अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असून, त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे एरवी पुण्यात रोमँटिक वाटणारा पाऊस सध्या व्हिलनची भूमिका बजावताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens commented about the Pune Rains