esakal | बारामतीकरांनो कमालीची काळजी घ्या, नव्या रुग्णांचा आकडा पोहोचला..
sakal

बोलून बातमी शोधा

new 123 corona positive patients were found in baramati

सोमवारपासून बारामतीत लॉकडाऊन सुरु करण्यात आल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी रुग्णसंख्या काही कमी होत नाही. बारामतीतील दवाखाने रुग्णांनी खचाखच भरलेले आहेत.

बारामतीकरांनो कमालीची काळजी घ्या, नव्या रुग्णांचा आकडा पोहोचला..

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील कोरोनाचा उद्रेक वाढतच असल्याने आता बारामतीकरांचा धीर सुटत चालला आहे. गेल्या चोवीस तासात बारामतीत तब्बल 124 रुग्ण नव्याने आढळल्याने आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 1655 वर जाऊन पोहोचला आहे. काल झालेल्या तपासण्यामध्ये बारामती शहरातील 68 तर ग्रामीण भागातील 56 रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

सोमवारपासून बारामतीत लॉकडाऊन सुरु करण्यात आल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी रुग्णसंख्या काही कमी होत नाही. बारामतीतील दवाखाने रुग्णांनी खचाखच भरलेले आहेत. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांचे प्राण वाचविण्यावर आता आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलेले असून बारामतीत येत्या दोन दिवसात सरकारी व खाजगी मिळून 50 अतिदक्षता विभागाचे बेडस कार्यरत होतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा येत्या चार दिवसात कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संपर्क कमी झाल्यामुळे रुग्णांची संख्याही कमी होईल असा सर्वांचाच अंदाज आहे. मास्कचा वापर, सॅनेटायझर्सचा वापर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे अशा बाबींचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे करायला हवे, वयोवृध्द नागरिकांची व लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असेही खोमणे म्हणाले. 

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

त्या रुग्णाच्या आगमनाने सर्वच जण व्यथित......
येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या कोविड केअर सेंटरमध्ये काल रात्री एका आईसह अवघ्या पाच महिन्यांचे बालक जेव्हा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण म्हणून आले, तेव्हा व्यवस्थापन करणारे स्वयंसेवकही व्यथित झाले. इतक्या छोट्या बाळाचे अशा ठिकाणी येणे कोणालाच अपेक्षित नव्हते, मात्र आईमुळे बाळालाही लागण झालेली होती. बारामतीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांना किरण गुजर यांनी पाचारण केले. मुथा यांनीही तातडीने भेट देत या बाळाची तपासणी केली. बाळ व्यवस्थित असून त्याच्यावर तातडीने औषधोपचार सुरु करण्यात आले. दरम्यान 100 रुग्ण क्षमतेच्या या कोविड सेंटर मध्ये काल रात्रीपर्यंत 79 रुग्ण दाखल झालेले असून आज सर्व सेंटरची क्षमता पूर्ण होईल असे गुजर यांनी सांगितले. 

अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई