पुणे जिल्ह्यात 4180 नवे कोरोना रुग्ण; तर एवढे रुग्ण झाले कोरोनामुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात एकूण 4 हजार 180 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 637 जण आहेत. आज दिवसभरात 3 हजार 887 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यात 4180 नवे कोरोना रुग्ण; तर एवढे रुग्ण झाले कोरोनामुक्त

पुण - पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात एकूण 4 हजार 180 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 637 जण आहेत. आज दिवसभरात 3 हजार 887 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये 1 हजार 151, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 1 हजार 6, नगरपालिका क्षेत्रात 318 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 68 नवे रुग्ण सापडले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 36 रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 34, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 15, नगरपालिका क्षेत्रातील 5 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.25) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता.26) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

कर्जहप्त्यावरील व्याज माफ करा; पुण्यातील व्यावसायिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

आजच्या कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 हजार 695, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 250, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 803, नगरपालिका क्षेत्रातील 10 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 129 जण आहेत. मागील साडेसहा महिन्यांपासून आजतागायत जिल्ह्यातील एकूण 6 हजार 220 कोरोना रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार 481, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 263, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 958, नगरपालिका क्षेत्रातील 346 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 172 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 235 रुग्ण आहेत.

मराठा क्रांती मोर्चा धडकणार राजकीय पक्ष कार्यालयांवर; पुण्यात होणार आक्रोश आंदोलन!

Edited By - Prashant Patil

loading image
go to top