पुर्व हवेलीत कोरोना जोमात, ग्रामपंचायत प्रशासन कोमात; शनिवारी आढळले नवे ७२ रुग्ण

new 72 corona patients in East Haveli on Saturday
new 72 corona patients in East Haveli on Saturday

उरुळी कांचन (पुणे)- कोरोनाने पुन्हा एकदा पुर्व हवेलीत थैमान घालण्यास सुरुवात केली असून, शनिवारी (ता.१) दिवसभरात थेऊर, मांजरी बुद्रुक, वाघोलीसह पुर्व हवेलीत कोरोनाचे नवीन ७२ रुग्ण आढळून आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुर्व हवेलीमधील थेऊर (१४), मांजरी बुद्रुक (१२), वाघोली (२४), वडकी (६), उरुळी कांचन (१), लोणी काळभोर (५), कदमवाकवस्ती (३), बकोरी (२), डोंगरगाव (१), लोणी कंद (१), पेरणे (२), वढु खुर्द (१) या बारा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे नव्याने ७२ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. थेऊर ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच, अचानक १४ रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मांजरी बुद्रुक, वाघोली, उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या पुर्व हवेलीमधील पाच प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत मागील तीन दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मांजरी बुद्रुक व वाघोली या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास तयार नसल्याचे चित्र मागील वीस दिवसांपासून दिसून येत आहे. वरील दोन्ही ग्रामपंचायतीप्रमानेच उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व थेऊर ग्रामपंचायत हद्दीतही कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. वरील पाच ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी दिवसभरात आढळून आलेल्या नवीण कोरोना रुग्णांच्याकडे पाहिल्यास, कोरोना वाड्यावस्त्यावर पोचण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारीही यातून सुटलेले नाहीत हे विशेष. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना जोमात, ग्रामपंचायत प्रशासन कोमात...
उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व थेऊरसह पुर्व हवेलीत कोरोना जोमात असला तरी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात करावयाच्या उपाय योजनाबाबत कोमात ग्रामपंचायत प्रशासन मात्र कोमात असल्याचे चित्र दिसुन येत आहे. रुग्ण आढळुन आलेला परीसर, रुग्ण रहात असलेली इमारत सॅनिटायझेशन करणे, रुग्ण आढळुन आलेला भागात कंटेन्मेट झोनची अंमलबाजावणी करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी असते. मात्र अपवाद वगळता सर्वच ग्रामपंचायत प्रशासनाने वरील गोष्टी कधाच सोडुन दिल्याचे दिसुन येत आहे. 

दरम्यान याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, मांजरी बुद्रुक, वाघोली, उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीमधील कांही विशिष्ठ ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाने पुन्हा जोमात हातपाय पसरण्यास सुरुवात केलेली आहे ही बाब खरी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर भुमिका घेणे आवश्यक आहे. हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याशी चर्चा करुन, कोरोनाची वाढ जादा असलेल्या ग्रामपंचायतींना योग्य ती खबरदारी घेण्याबाबतच्या सुचना दिल्या जातील. नागरीकांनीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com