दुचाकीसोबत हेल्मेट खरेदी कागदावरच

दुचाकीसोबत हेल्मेट खरेदी कागदावरच

पुणे -  दुचाकीची खरेदी करतानाच संबंधित व्यक्तीला दोन हेल्मेट देण्याबाबतचा आदेश दुचाकी वाहन विक्रेत्यांना परिवहन खात्याने दिला; परंतु वाहन वितरकांनी हा आदेश धुडकावून लावला आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरातील सुमारे २० हजार नवीन दुचाकींची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी करण्यात आली आहे; परंतु यातील ९० टक्के दुचाकी विकताना वितरकांकडून हेल्मेटची सक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या वितरकांना आरटीओकडून अभय मिळत असल्याचे दिसून आले आहे.

केंद्रीय मोटर वाहन अधिनियम, १९८९ नुसार एक हेल्मेट वाहनचालकाला देणे बंधनकारक आहे. वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे. यासंदर्भात परिवहन विभागाकडून एक परिपत्रक काढत, ‘नवीन दुचाकी घेणाऱ्या ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, याची शहरातील वितरकांकडून काटेकोर अंमलबजावणी होत नसून. आरटीओकडून त्यांच्यावर कारवाईदेखील होत नाही. शहरामध्ये हेल्मेटसक्तीची काटेकोर अंमलबजावणी वाहतूक पोलिसांनी १ जानेवारीपासून सुरू केली होती. मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये शहरातील वितरकांनी या सक्तीला हरताळ फासल्याचे दिसून येते. या दोन महिन्यांमध्ये आरटीओमध्ये नोंदणी झालेल्या सुमारे २० हजार दुचाकींमध्ये ९० टक्के दुचाकींची हेल्मेट न देताच विक्री करण्यात आली. ग्राहकाकडे हेल्मेट असल्यास त्याच्याकडून त्याबाबत लेखी घेणे वितरकावर बंधनकारक आहे. मात्र, त्यामध्ये मोठ्याप्रमाणात बोगस व्यवहार  केला जात आहे. 

हेल्मेट नसतानाही ग्राहक ते असल्याचे लेखी देतो. तर काहीवेळा वितरक लेखी घेतही नाही. दुचाकीबरोबर हेल्मेटचा खर्चदेखील पडत असल्याने ग्राहक हेल्मेट घेण्यास टाळाटाळ करतात.

नवीन दुचाकीबरोबर वितरकास दोन हेल्मेट देणे बंधनकारक असले तरी, त्याचा बोजा हा ग्राहकावर पडणार असल्याने ग्राहक दोन हेल्मेट घेण्यास उत्सुक नसतात. ग्राहकास हेल्मेट घेण्याची सक्ती केली, तर दुचाकीच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो.
- दुचाकी वितरक

दुचाकी खरेदी करताना हेल्मेट विकत घेणे बंधनकारक आहे. ग्राहकाकडे हेल्मेट असल्यास वितरकाने तसे लेखी घेणे गरजेचे आहे. दुचाकी वितरक असे करीत नसतील तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com