बेकायदा बांधकामांविरोधात नवी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - अनधिकृत बांधकामांची अचानक तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा पीएमआरडीने केली आहे. 

पुणे - अनधिकृत बांधकामांची अचानक तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा पीएमआरडीने केली आहे. 

अनधिकृत बांधकामे रोखण्यात पीएमआरडीएला अपयश आले असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी खासगी कंत्राटदारांची नेमणूक करून अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन केले होते. मात्र ते फसले. त्यानंतर अपुऱ्या कर्मचारी वर्गाचे कारण पुढे करून पीएमआरडीएकडून वेळकाढूपणा करण्यात आला. कारवाई करण्यासाठी सरकारकडून वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकार आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीस मान्यता देण्यात आली. त्यानंतरही कारवाई करण्यास प्राधिकरण अपयशी ठरले. असे असताना आता नव्याने मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नव्या मोहिमेची सुरवात मांजरी बुद्रुक (ता. हवेली) परिसरातून सुरू केली आहे. या कारवाईकरिता हद्दीतील काही परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तपासणी दरम्यान आढळून आलेल्या अनधिकृत बांधकामांना बांधकाम थांबविण्याचे आदेश देण्यात येणार आहे. 

अनधिकृत बांधकामे ताबडतोब बंद करावीत; अन्यथा गुन्हे दाखल करून बांधकामे पाडण्याची कारवाई केली जाईल. ही मोहीम कडकपणे राबविली जाणार आहे. यामुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसणार आहे.
- किरण गित्ते, आयुक्त प्राधिकरण

Web Title: New Campaign for Illegal Construction