विद्यमानांसह अनपेक्षित उमेदवारांची चाहूल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पुणे : वस्ती आणि झोपडपट्ट्यांचे प्राबल्य असलेल्या, तसेच हद्द विखुरलेली असलेल्या कोरेगाव पार्क प्रभाग क्रमांक 21 मध्ये इच्छुकांची मांदियाळी रंगली आहे. विद्यमान नगरसेवकांशिवाय शहराच्या अन्य भागांतून अनपेक्षित उमेदवार येथे प्रमुख पक्षांतून नशीब आजमावतील, अशी चर्चा येथे आहे. त्यामुळे येथील उमेदवारीबद्दल औत्सुक्‍य आहे.

पुणे : वस्ती आणि झोपडपट्ट्यांचे प्राबल्य असलेल्या, तसेच हद्द विखुरलेली असलेल्या कोरेगाव पार्क प्रभाग क्रमांक 21 मध्ये इच्छुकांची मांदियाळी रंगली आहे. विद्यमान नगरसेवकांशिवाय शहराच्या अन्य भागांतून अनपेक्षित उमेदवार येथे प्रमुख पक्षांतून नशीब आजमावतील, अशी चर्चा येथे आहे. त्यामुळे येथील उमेदवारीबद्दल औत्सुक्‍य आहे.

नव्याने तयार झालेल्या प्रभागाची सुमारे 84 हजार लोकसंख्या आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक बाबू वागस्कर, नगरसेविका वनिता वागस्कर यांच्या जुन्या प्रभागातील बहुतांशी आणि पिंगळे वस्ती, मुंढव्याचा काही भाग, जहॉंगीर वस्ती आदी भाग नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुरेखा कवडे, नगरसेवक प्रशांत म्हस्के यांच्या जुन्या प्रभागातील ढोबळवाडी, सोपानबाग, जांभळकर मळा आदी सुमारे 20 टक्के परिसर वगळता उर्वरित भाग या प्रभागात आहे. कोरेगाव पार्क, भीमनगर, शिंदे वस्ती, बीटी कवडे रस्ता, पंचशीलनगर, आगवली चाळ, कवडेवाडी, मदारी वस्ती, कोरेगाव पार्क, बोट क्‍लब रोड, मंगलदास रोड, लडकतवाडी, कपिला डेअरी, लोकसेवा वसाहत, उल्हासनगर, जहॉंगीर वस्ती या परिसराचा नव्याने तयार झालेल्या प्रभागात समावेश आहे. सुमारे 60 टक्के वस्ती, तर 40 टक्के सोसायट्या या प्रभागात आहे. खुला, सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, असे आरक्षण आहे. सर्वसाधारण गटापेक्षा अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातील आरक्षणासाठी या प्रभागात जास्त इच्छुक आहेत. या प्रभागात रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), तसेच अन्य आंबेडकरी चळवळीतील इच्छुकही विविध पक्षांच्या माध्यमातून येथे प्रयत्न करत आहेत. कोरेगाव पार्क, बोट क्‍लब रोड, ताडीवाला रोड, घोरपडीचा काही परिसर या भागात मनसेचे प्राबल्य आहे, तर घोरपडी परिसरात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. कॅंटोन्मेंट निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे घोरपडी आणि लगतच्या कोरेगाव पार्क भागातून भाजपच्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटनात्मक कार्य आहे. त्यामुळे या पक्षातील "सैनिकांनाही' अपेक्षा आहेत, तर कॉंग्रेसची परंपरागत मतांवर भिस्त आहे. या प्रभागात अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून इच्छुकांची नावे मनसेने हेतूत: जाहीर केलेली नाहीत. विरोधकांना आश्‍चर्यचकीत करणारे आमचे उमेदवार असतील, असा त्यांचा दावा आहे. उमेदवारीच्या स्पर्धेत प्रमुख पक्षांतून पक्षांतराचीही चिन्हे या प्रभागात असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस : प्रशांत म्हस्के, सुरेखा कवडे, प्रमोद कामठे, संकेत कवडे, कपील गवारे, गणेश लांडगे, विजय हिंगणे, भीमराज कवडे, नितीन रोकडे, राजाभाऊ बारहाते, संतोष बोतालजी, कल्पना हिंगणे, प्रतिभा गायकवाड, नयनेश वठारे, वैशाली निवासलारे.

भाजप : प्रकाश मंत्री, नवनाथ कांबळे, किरण कांबळे, मंगला मंत्री, योगेश पिंगळे, नारायण सावा, सुशांत निगडे, जयदेव रंधवे, रवींद्र खैरे, अजय पाटोळे, सारिका पिंगळे, मारुती भद्रावती, सचिन वाठारे, किशोर धायरकर, संकेत कवडे, प्रमोद कामठे, अतुल कवडे.

कॉंग्रेस : बंडू गायकवाड, उमेश गायकवाड, संगीता तिवारी, पूनम बोराटे, महेंद्र तडके, प्रदीप परदेशी, संजय कवडे, गोकुळ परदेशी, सुरेखा संजय कवडे, गणेश कवडे, ऍड. अविनाश कवडे, मनोज टंकसाळे, राजेश गायकवाड, सुभाष सरोदे.
शिवसेना : वीरेंद्र गायकवाड, नितीन पत्की, दिलीप कवडे, कविता सोनवणे, गणेश लडकत, चेतन कवडे, नितीन निगडे, बापू वाघे, गणेश भापकर, गणेश वठारे, वर्षा कवडे, अनिता जामले

मनसे : बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, विनोद कट्टीमणी

Web Title: New candiates in Pune Corporation Election