बँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

ए. सी. राऊत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार तात्पुरता सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे - डीएसके कर्ज प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे हे अडचणीत आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर बँकनेही त्यांचा पदभार काढून घेतला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांचेही सर्व अधिकार बँकेने काढून घेतले आहेत.  

ए. सी. राऊत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार तात्पुरता सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपुर्वी अटक केली होती. या चारही अधिकाऱ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता रवींद्र मराठे आणि आर. के. गुप्ता यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरपणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत रविंद्र मराठे यांची अटक चुकीची असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A new CEO of Bank of Maharashtra is A C Raut