असुरक्षित वातावरणाने नवीन डॉक्‍टर धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे नव्याने या क्षेत्रात येणारे मुले-मुली धास्तावले आहेत. दिवस-रात्र अभ्यास करून वैद्यकीय शाळेत प्रवेश मिळविला. तो अभ्यासक्रम पूर्ण करून आता ‘प्रॅक्‍टिस’ सुरू करतानाच रोज कोणावर तरी हल्ला झाल्याचे समजते आहे. त्यामुळे मोठ्या उमेदीने निवडलेल्या या क्षेत्रात पुढे जायचे तरी कसे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 

डॉक्‍टर आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टरांवरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एमबीबीएस’ होऊन पदव्युत्तर पदवीची तयारी करत असलेल्या काही डॉक्‍टरांशी संवाद साधला, तेव्हा त्यांना पडलेले प्रश्‍न पुढे आले.

वैद्यकीय क्षेत्राची आवड म्हणून आम्ही येथे आलो. वैद्यकीयला प्रवेश मिळविण्यासाठी बारावीला जीव तोडून अभ्यास केला. मेडिकलचा अभ्यास करताना गेली पाच वर्षे आम्हाला दिवाळी माहीत नाही की दसरा. रात्रभर जागून रुग्णसेवा करायची. दिवसाची ‘हेव्ही ड्यूटी’ करायची. या सर्वांतून वेळ काढून किमान आठ तास अभ्यास करायचा; परंतु आता डॉक्‍टर झाल्यावर प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी चांगले वातावरण आहे, असे वाटत नाही. 

‘मी माझे कष्ट ‘राइट प्रोफेशन’मध्ये टाकले का,’ असा प्रश्‍न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मनात येत आहे. मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी एवढे कष्ट घेतले आणि आता त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची वेळ असताना देशात कुठेच सुरक्षित वातावरण दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

डॉक्‍टरांविरुद्धचे हे देशातील वातावरण निश्‍चितच एखाद्या चांगल्या समाजासाठी योग्य नाही. आम्हाला मेडिकलमध्ये उत्साह होता आणि अजूनही तो आहे आणि भविष्यातही तो तितकाच राहणार आहे. या देशातील डॉक्‍टरांकडे पाहण्याची दृष्टी बदलली नाही, तर भविष्यात चांगली मुले या क्षेत्राकडे वळणार नाहीत. आम्ही येथे प्रॅक्‍टिस करताना दिवसाला साठ-सत्तर रुग्ण तपासण्यापेक्षा परदेशात जाऊन तेथे मोजकेच रुग्ण तपासू, अशा पर्यायांवरही विचार करत असल्याचे एका नवीन डॉक्‍टरांनी सांगितले.

Web Title: The new doctor unsafe environment paved