दुसरी पिढीही निवडणुकीच्या आखाड्यात

दुसरी पिढीही निवडणुकीच्या आखाड्यात
दुसरी पिढीही निवडणुकीच्या आखाड्यात

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीची संधी साधत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राजकारणातील दुसरी पिढी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत आहे. काही पदाधिकारी स्वतःबरोबरच मुलगा, मुलीला किंवा सुनेला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ, भीमराव तापकीर यांचा मुलगा रोहन, पुतण्या अभिषेक, आमदार जयदेव गायकवाड यांचा मुलगा मयूर, आमदार योगेश टिळेकर यांचा भाऊ चेतन, माजी महापौर अली सोमजी यांचा मुलगा नुरुद्दीन, माजी उपमहापौर दीपक मानकर यांचा मुलगा राघवेंद्र ऊर्फ बापू, शिवाजी गदादे यांचा मुलगा प्रेमराज, माजी नगरसेवक शांतिलाल मिसाळ यांची मुलगी काजल, लालसिंग परदेशी यांची सून वैशाली, शिवाजी केदारी यांचा मुलगा साहिल, लता राजगुरू यांचा मुलगा अमोल, शंकरराव म्हात्रे यांची सून रजनी, शंकरराव कुरुमकर यांचा मुलगा सुधीर, शिवराम मेंगडे यांचा मुलगा सुशील, प्रकाश म्हस्के यांचा मुलगा कुणाल, राजाभाऊ तुंगतकर यांचा मुलगा प्रतीक, गणेश घुले यांचा मुलगा गौरव, आंदेकर कुटुंबातून वनराज आणि शिवम आदी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

राजकारणात कौटुंबिक वारसा असलेली अनेक कुटुंबे शहरात आहेत. शिवाजीनगरमधून शिरोळे, ताडीवाला रस्ता परिसरातून ढोले पाटील, कात्रज- कोंढव्यातून बाबर, कदम, धनकवडीतून धनकवडे, नगर रस्त्यावरून पठारे, टिंगरे, मुळीक, म्हस्के; हडपसरमधून तुपे, मुंढव्यातून गायकवाड, सिंहगड रस्त्यावरून दांगट, चाकणकर, चरवड; पर्वतीमधून तावरे, लांडगे, लष्कर भागातून मंत्री, मगरपट्टा परिसरातून कवडे, वारज्यातून बराटे, बारटक्के; औंधमधील गायकवाड, पाषाणमधून निम्हण, बाणेर- बालेवाडीमधून चांदेरे, बालवडकर आदी कुटुंबांतूनही नवी पिढी निवडणुकीसाठी इच्छुक आहे.

काही कुटुंबांतून विद्यमान सदस्यांचा मुलगा, मुलगी किंवा सून रिंगणात उतरण्याच्या मनःस्थितीत आहेत. आरक्षणामुळे काही सदस्यांनी मुलीचा किंवा सुनेचाही पर्याय खुला ठेवला आहे. काहीजणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत; परंतु प्रभागात राजकीय पक्षांकडून समोरून कोणते उमेदवार येतील, यावर उमेदवारी ठरविणार आहे. कौटुंबिक वारसा असलेल्या कुटुंबात निवडणुकीचे गणित माहीत असते. तसेच, परिसरातील मतदारांना आडनावामुळे कुटुंबाची माहिती झालेली असते, त्याचा फायदा निवडणुकीत घेता येऊ शकतो, असे एका इच्छुकाने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com