'मुख्यमंत्री महोदयांना एकर आणि हेक्टरमधील फरक कळत नाही'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

एकनाथ खडसे कुठेही जाणार नाहीत. उद्धव ठाकरेंना कोणीही भेटू शकते. तसे खडसे भेटले आहेत, खडसे अन्य कुठल्याही पक्षात जाणार नाहीत.

पुणे : मुख्यमंत्री ठाकरे यांना एकर आणि हेक्टरमधील फरक कळत नाही. साखरेचा विषय आला की ते जयंत पाटील तर महसुलबाबत थोरातांकडे पाहतात, मग यांना कशातले कळते ? केवळ तुमच्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का? असा सवाल करत भाजपाचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार व मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

दरम्यान पुढे ते म्हणाले, लोकांचे प्रश्न सोडवायचे तर कुठले खाते कोणाकडे हे सरकारलाही कळत नाही. मंत्रीमंडळ विस्तार का करीत नाहीत? सहा मंत्री असताना घेतलेले निर्णय बेकायदा आहेत. शरद पवार हास्यास्पद बोलत आहेत, राष्ट्रवादीत कोणाला ग्रहखाते नको असेल तर ते शिवसेनेला द्या, असा टोला त्यांनी यावेळी हाणला. सावित्रीबाई फुले यांच्या संबधी स्थळांचा विकास करावा असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

Image result for chandrakant patil criticize uddhav thackeray

हेही वाचा :  …तर भारताचे लष्कर पीओकेमध्ये हल्ला करेल 

एकनाथ खडसे कुठेही जाणार नाहीत. उद्धव ठाकरेंना कोणीही भेटू शकते. तसे खडसे भेटले आहेत, खडसे अन्य कुठल्याही पक्षात जाणार नाहीत. एकनाथ खडसेची केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली त्याची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले, ते शिवसेनेत जातील याला काही अर्थ नाही. शिवसेनेकडे त्यांना देण्यासाठी आहे तरी काय, कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाली त्यामुळे आम्हाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले यातच आमचे यश आहे. सोलापुर, सांगलीत आम्ही आलो आहोत हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सध्याच्या सरकारने नीतिमूल्ये सोडली आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाला आहे, यांना बाकीच्यांचे काही देणं-घेणं नाही. रावते, जाधव यांना त्यांनी डावलले आहे. मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे, त्यात सावरकर व गोडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण आहे, ही बाब निंदनीय आहे. आम्ही रस्त्यावर उतरून निषेध करणार आहोत. या विषयावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New govt in Maharashtra is violating all rules says Chandrakant Patil