पुण्यात लवकरच नवे कारागृह

दिलीप कुऱ्हाडे 
शनिवार, 28 एप्रिल 2018

येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीस बराकींमध्ये २३२३ कैदी क्षमता आहे. मात्र, या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने नव्याने होणाऱ्या पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, पिंपरी- चिंचवडमध्ये कारागृहासाठी आवश्‍यक पंधरा एकर जागा उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. त्यामुळे कारागृह प्रशासनाने नव्याने येरवडा कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहतीच्या मागील बाजूस अडीच हजार कैदी क्षमतेचे नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे सध्याचे क्षेत्रफळ ६५ एकर आहे. एकूण कैदी क्षमता २३२३ असताना सध्या कारागृहात पाच हजार कैदी आहेत. कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराकी, सर्कल दोनमध्ये सहा बराकी, तर किशोर विभागात तीन बराकी आहेत. यांसह अंडा सेल, फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी, रुग्ण कैदी, ज्येष्ठ नागरिक कैदी, विदेशी कैदी अशांना दाटीवाटीने विविध बाराकींमध्ये ठेवले आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची गर्दी पाहता कारागृह प्रशासनाने पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी नवीन कारागृहाचा प्रस्ताव तयार करून गृहविभागाकडे पाठविला होता. मात्र, पिंपरी- चिंचवडमध्ये कारागृहासाठी आवश्‍यक पंधरा एकर जागा उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कारागृह प्रशासनाला कळविले होते. 

कारागृह प्रशासनाने नव्याने येरवडा कारागृहाच्या मोकळ्या जागेत अडीच हजार कैदी क्षमेतेचे नवीन कारागृह बांधण्याचा नवीन प्रस्ताव गृहविभागाला पाठविला आहे. येरवडा कारागृहाच्या ताब्यात सध्या पाचशे एकर जागा आहे. यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह, महिला कारागृह, येरवडा खुले कारागृह, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, कारागृह कर्मचारी व अधिकारी निवासस्थाने, कारागृह मुद्रणालय, कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहत आणि शेतीची जागा आहे. कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहतीच्या मागील बाजूस कारागृहासाठी आवश्‍यक जागा असल्याने तेथे नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे समजते.

पोलिस गृहनिर्माण संस्था करणार बांधकाम
राज्य सरकारच्या नवीन अध्यादेशाप्रमाणे राज्यातील पोलिस किंवा कारागृहासंबंधीची कामे आता सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी पोलिस गृहनिर्माण संस्थेला देण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन कारागृह पोलिस गृहनिर्माण संस्था बांधणार आहे. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणीही केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

येरवडा कारागृह क्षेत्रफळ 65 एकर
बराकींची संख्या 30
कैदी क्षमता 2323
सध्याचे कैदी 5000

Web Title: new jail in pune