20 मिनिटांत बुजणार रस्त्यावरील खड्डा

अरुण गायकवाड
मंगळवार, 9 मे 2017

"इन्फ्रारेड रिसायकलिंग रोड पॅचिंग' नावाच्या या तंत्रज्ञानाचा वापर करुन नाव केवळ वीस मिनिटात एक बाय दोन मीटरचा खड्डा बुजविता येणे शक्‍य होणार आहे.

पिंपरी - आधुनिक पद्धतीने खड्डे बुजविणाऱ्या उपकरणाचे आज प्रात्यक्षिक घेण्यात आले. शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यासह महापालिकेतील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खड्डे बुजविण्याचे नवीन तंत्रज्ञान दाखविण्यात आले. तथापि, या उपकरणाबाबत पुढील कोणताही निर्णय झालेला नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. "इन्फ्रारेड रिसायकलिंग रोड पॅचिंग' असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रज्ञानामुळे केवळ वीस मिनिटात एक बाय दोन मीटरचा खड्डा बुजविता येणे शक्‍य होणार आहे.

 

Web Title: New machine for Road patch work

व्हिडीओ गॅलरी