पाचवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची भरली शाळा पण ऑनलाईन; तेही फ्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील इयत्ता चौथीतून पाचवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सेमी इंग्लिश पूर्वतयारी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थीनी अभ्यासाचा आनंदही घेतला.

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत इयत्ता चौथीतून पाचवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र शाळा भरू लागली आहे. त्यामुळे सुटीची मज्जा लुटत असताना दुसरीकडे विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभ्यासाचा आनंदही घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील इयत्ता चौथीतून पाचवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सेमी इंग्लिश पूर्वतयारी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. विनामूल्य चालणाऱ्या या वर्गात जवळपास सव्वाशे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाने भरविलेल्या या ऑनलाइन वर्गाचे आयोजन पालक संघाचे उपाध्यक्ष प्रवीण महामुनी यांनी केले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांच्यामध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा या दृष्टीने शाळेत हा उपक्रम घेण्यात आला. अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषयाचा अंतर्भाव असल्याने विद्यार्थ्यांना वाटणारी इंग्रजीची भीती ही कमी व्हायला मदत होते. तरीही पाचवीच्या दृष्टीने सेमी इंग्रजी शिकताना गणित आणि विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात. जास्त मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा, या हेतूने हा वर्ग घेण्यात आला.

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

विद्यार्थ्यांनी असा केला अभ्यास :
- 'व्हर्च्युअल ब्लॅकबोर्ड'च्या सहाय्याने  सोडवली गणिते
- विज्ञानातील संकल्पना शिकले
-  इंग्रजी व्याकरणानुसार वाक्ये तयार करण्याचा केला सराव
- रोजचा होमवर्क 'इमेज'द्वारे तपासून घेतला

"पालक व विद्यार्थ्यांना हा वर्ग मनापासून आवडला आहे. विद्यार्थी मोबाईलचा वापर अभ्यासासाठी ही करत आहेत, हे चांगले आहे. कितीही संकटे आली तरी अभ्यासात खंड पडणार नाही, हे निश्चित,"
- कल्पना वाघ, मुख्याध्यापिका, नवीन मराठी शाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Marathi English preparatory school for students was held online semi class