जुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप 

शरयू काकडे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या वस्तू वापरत आहोत अशी भावना ग्राहकांना येऊ नये यासाठी त्यामध्ये नावीन्य आणि वैविध्य जपण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. या संकल्पनेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. ग्राहकांनी जुने कपडे तर देतातच पण त्याचबरोबर जुन्या कापड्यांपासून बनवलेले इकोफ्रेंडली वस्तू देखील खरेदी करतात. ग्राहकांकडून 8 रुपये किलो या दराने हे कपडे खरेदी केले जातात. तसेच इकोरिगेनच्या इकोफ्रेंडली वस्तू खरेदीसाठी अशा ग्राहकांना सूट देखील दिली जाते. लोकांमध्ये जुन्या कापड्यामुळे होणाऱ्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण झाल्यामुळे या इकोरिगेनला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्राहकांच्या या प्रतिसादला आणि पर्यावरणपूरक संकल्पनेतील योगदानला इकोरिगेनतर्फे ग्रिनसिटीझन प्रमाणपत्र देऊन सन्मान देखील केला जातो. 

पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून 'इकोरिगेन'ने व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे झेप घेतली.

पर्यावरणपूरक आणि वेगळ्या विषयावर स्टार्टअप सुरू करण्याची ही कल्पना सत्यात उतरवली ती स्वप्निल जोशी या तरुणाने. तसा तो पेशाने इंजिनियर. बीई (इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन), एमबीएचे शिक्षण पूर्ण करून स्वतःची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी असताना त्याने या क्षेत्रात उडी मारली. खरं तर त्याच्याकडील कुतुहलामूळे तो या क्षेत्राकडे वळला. एक फॅशन आर्टिकल वाचल्यानंतर इतक्या कपड्यांचं नक्की काय होत असावं असा प्रश्न त्याला पडला. त्याला पडलेल्या या प्रश्नांचं उत्तर शोधत तो पानिपतपर्यंत पोहोचला. पानिपत हे जुन्या कपड्यांचे हब मानले जाते. तिथे कित्येक टन जुने कपडे पुनर्निर्मितीसाठी विदेशातून येतात. हे सर्व बघून स्वप्निलला या जुन्या कपड्यांमध्ये कचरा नाही तर व्यवसायासाठी संधी दिसली. इथूनच इकोरिगेनचा प्रवास सुरु झाला.
Eco product

सर्व पैलूंचा अभ्यास  केल्यानंतर जुन्या कपड्यांचे वाढते प्रमाण, पर्यावरणची होणारी हानी आणि जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या वस्तूंना असणारी मागणी लक्षात आली. त्याने या कपड्यांना नवीन स्वरूप तर दिलेच पण त्यासोबत त्याला बाजारपेठ देखील मिळवून दिली. नव्या जुन्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले. इतकेच नाही तर गरजू महिलांसाठी रोजगार देखील यातून निर्माण केला. eco bag

इकोरिगेनच्या 'वी रिसायकल, यु रिगेन' या ब्रीदवाक्यानुसार आपली वाटचाल सुरू केली. जुन्या कपड्यांचे पुनर्निर्माण आणि पुनर्वापर या दोन गोष्टींवर भर दिला. जुन्या कपड्यातील चांगल्या अवस्थेतील कपड्यांचा पुनर्वापर करून  हँडबॅग, कॅरीबाग, ट्रॅव्हलबॅग, ट्रॅव्हल पाऊच, स्लिंग बॅग विविध बॅग बनविल्या जातात. ग्राहकांना आवडतील अशा नवीन स्वरूपात या डिझायनर बॅग बनविल्या जातात. त्यासाठी गरजू महिलांना बॅग शिवण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांचे सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले जातो. उपयुक्त नसलेले कपडे पानिपतला पुन:र्निर्माण करण्यासाठी पाठवले जातात. तेथे कित्येक टन जुने कपडे क्रश करून त्याचे कापसामध्ये रूपांतर होते. त्यानंतर त्यापासून नव्याने गालिचा, सतरंजी सारख्या वस्तू बनविल्या जातात.
eco bag

जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या वस्तू वापरत आहोत अशी भावना ग्राहकांना येऊ नये यासाठी त्यामध्ये नावीन्य आणि वैविध्य जपण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. या संकल्पनेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. ग्राहकांनी जुने कपडे तर देतातच पण त्याचबरोबर जुन्या कापड्यांपासून बनवलेले इकोफ्रेंडली वस्तू देखील खरेदी करतात. ग्राहकांकडून 8 रुपये किलो या दराने हे कपडे खरेदी केले जातात. तसेच इकोरिगेनच्या इकोफ्रेंडली वस्तू खरेदीसाठी अशा ग्राहकांना सूट देखील दिली जाते. लोकांमध्ये जुन्या कापड्यामुळे होणाऱ्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण झाल्यामुळे या इकोरिगेनला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्राहकांच्या या प्रतिसादला आणि पर्यावरणपूरक संकल्पनेतील योगदानला इकोरिगेनतर्फे ग्रिनसिटीझन प्रमाणपत्र देऊन सन्मान देखील केला जातो. इकोरिगेनला पुण्यातच नव्हे तर देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. देशात स्वतःची ओळख निर्माण करण्याचे ध्येयाकडे इकोरिगेनची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
swapnil joshi : eco regain


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New market of old clothes : eco-friendly startup