चाचणी न करताच महावितरणाकडून ग्राहकांना नवीन मीटर 

Mahavitaran
Mahavitaran

लोणी काळभोर - उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, लोणी कंद, वाघोलीसह पुर्व हवेलीमधील सर्वच गावातील नव्व्याण्णव टक्के ग्राहकांना वाढिव विज बिले येत असल्याने नागरीक गोंधळले आहेत. याबाबत विचारणा केली असता महावितरण ग्राहकांच्या परवानगीशिवायच नवीन मीटर बसवत असल्याचे समोर आले आहे. वास्तिवक महावितरणाने ग्राहकांना नवीन मीटर देण्यापुर्वी चाचणी (Testing) करणे बंधनकारक आहे. परंतु, असे न करताच हे मीटर बसविण्यात येत असून, हा प्रकार गेल्या दहा वर्षांपासून, सुरु असल्याचे समोर आले आहे. शिवाय या मीटरवर चाचणी केल्याचे खोटे लेबलही लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांनीच नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. 

नवीन मिटरचे मासिक बिल वाढीव येत असल्याची बाब उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रतिकांत बबन यादव यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ग्राहकांना देण्यात येणारी विज बिले व नवीन मीटर तपासुन येतात की नाही. याबाबतची माहिती  महावितरणाकडून लेखी स्वरुपात माहिती मागवली होती. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

विज वितरण कंपनीच्या फुरसुंगी येथील मीटर तपासणी लॅबमधील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, मागील कांही वर्षापासुन एलएनटी, एचपीएल, एचई, पीएम, रोलॅक्स, फ्लॅश व जिनस या सात मिटर उत्पादक कंपन्यांचे मीटर ग्राहकांना दिले जात आहेत. सातपैकी पीएम, रोलॅक्स, फ्लॅश या तीन कंपण्याना विज मीटर सदोष असल्याच्या कारणावरुन काळ्या यादीत टाकले आहे. यामुळे सध्या तरी चारच कंपन्यांचे मीटर पुरवले जात आहेत. वरिल कंपन्यांकडून फुरसुंगी येथील गोदामात हजारोच्या संख्येने नवीन मिटर पुरवले जातात. फुरसुंगी येथे मिटर तपासणी लॅब आहे. मात्र मीटरच्या चाचण्या घेण्यासाठी पुरेसे करामचारी नसल्याने या मीटरची चाचणी होत नाही.

मुळशी विभागातील उरुळी कांचन, हडपसर, मुळशी व नारायणपूर येथील उपविभागीय कार्यालयार्फे मीटर पाठवले जातात. मीटर सोबत मिटर सिल करण्यासाठी लागणारे साहित्यही दिले जाते. याबाबतची माहिती विज वितरण कंपनीच्या सर्वच कर्मचाऱ्यांना असल्याने, कर्मचारी आपआपल्या भागातील ग्राहकांना मीटर देण्यापूर्वी सांकेतीक क्रमांक टाकुन नवीन मिटर देतात. हा प्रकार मागील काही वर्षापासुन सुरु आहे. 

उरुळी कांचन विभागाच्या कार्यकाऱी अभियंता, प्रदीप सुरवसे म्हणाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या मागणीप्रमाणे वरीष्ठ कार्यालयाकडे नवीन मिटरची मागणी केली जाते. या मागणीनुसार फुरसुंगी येथुन आमच्या उरुळी कांचन येथील कार्यालयात मीटर दिले जातात. फुरसुंगी येथील कार्यालयाकडुन पुरवण्यात आलेल्या मीटरच्या चाचण्य़ा केल्या आहेत व विज कंपनीच्या मापदंडानुसार असल्याचे गृहीत धरुन ग्राहकांना दिले जातात. सर्वच मीटरची च्चाचणी केली जात नाही ही बाब सत्य आहे. मात्र वरील कंपण्याच्या कडुन येणारे मीटरच मापदंडानुसार असल्याने ग्राहकांच्या फारशा तक्रारी येत नाही. मात्र तरीदेखील कोणाच्या मीटर बाबत तक्रारी असल्यास, त्यांनी आमच्या कार्यालयात तक्रारी नोदवाव्यात. त्वरीत पहाणी करुन तक्रारी सोडवण्यात येतील असेही सुरवसे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com