'पुण्याच्या विकासासाठी नवे मॉडेल राबविणार'

A new model will be implemented for the development of Pune says  Muralidhar Mohol
A new model will be implemented for the development of Pune says Muralidhar Mohol

पुणे - पुण्याचे नवे महापौर म्हणून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी (ता. २२) सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मोहोळ आणि नव्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी ‘सकाळ’ कार्यालयास भेट दिली. या वेळी पुणेकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रमुख सात मुद्द्यांवर मोहोळ यांच्याशी संवाद साधला, त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पुण्याच्या विकासासाठी नवे मॉडेल राबविणार असल्याचे सांगितले. 

वाहतूक 
मेट्रोसोबत ‘एचसीएमटीआर’चे जाळे प्रत्यक्ष उतरविले जाणार आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे जोडण्याचा प्रयत्न आहे. पीएमपीच्या ताफ्यात ई-बस आणि सीएनजी बसगाड्या वाढवू. वर्दळीचे चौक मोकळे करण्याची योजना तयार केली आहे. 

पाणी 
जादा पाण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. पुणेकरांना पुरेसे पाणी मिळेल. समान पाणीपुरवठा योजनेला गती दिली जाईल. भामा-आसखेड चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. या उपाययोजनांमुळे सर्वत्र समान पाणी मिळेल.

आरोग्य 
आरोग्य यंत्रणेत तज्ज्ञ आणि डॉक्‍टरांची संख्या वाढवून रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळतील. शहरी गरीब योजनेचा उद्देश  साध्य करू. त्यासोबत नवे वैद्यकीय महाविद्यालही सुरू केले जाईल. काही रुग्णालयांत अतिदक्षता विभाग सुरू केले जातील.

शिक्षण 
शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयोग नव्या वर्षात होतील, त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना मिळेल. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसारच ई-लर्निंग आणि मॉडेल स्कूल सुरू केले जातील. आनंददायी शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच शाळांत पुरेसे शिक्षक असतील याची काळजी घेण्यात येईल.

पर्यावरण 
पर्यावरणाच्या दृष्टीने नदीसुधार (जायका) आणि नदीकाठ संवर्धन योजनेची प्रक्रिया लवकर करू. ज्यामुळे मुळा-मुठेचा प्रवाह खळाळत राहील. चौका-चौकांतील वाहतूक कोंडीवर प्रत्यक्ष उपायांची योजना असेल. 

स्वच्छता 
शहराची स्वच्छता राखण्याबरोबरच जुन्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढवीत आहोत. नवे प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहेत, त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्‍य होईल. यासाठी गृहप्रकल्पांनाही प्रोत्साहन देत आहोत. 

कला-संस्कृती 
सांस्कृतिक पुण्यासाठी नवे आणि प्रभावी व्यासपीठ उभारण्याची गरज आहे, त्यासाठी कलाकारांना एकत्र आणून ठोस कार्यक्रम हाती घेतला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com