महापालिकेची नवीन इमारत सुरक्षित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे - महापालिकेच्या नव्या इमारतीतून पाणीगळती झाली असली, तरी ती सुरक्षित असल्याचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) दिला आहे. या इमारतीमध्ये आवश्‍यक ती कामे करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम खात्याने शुक्रवारी सांगितले. 

महापालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या इमारतीचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी झाले. या कार्यक्रमात पावसामुळे इमारतीच्या घुमटातून पाणीगळती झाली होती. काम अर्धवट असतानाच उद्‌घाटन करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा गळती झाल्याने इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर या इमारतीची "सीओईपी'तील तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार बांधकामाचा वेळ, त्यासाठीचे साहित्य आणि घटनांना अभ्यास करून "सीईओपी'ने "स्ट्रक्‍चरल ऑडिट'चा अहवाल महापालिकेला दिला आहे. 

महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, ""नवी इमारती सुरक्षित असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. मात्र ज्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे. त्यानुसार कामे करून त्याबाबतचा अहवाल "सीओईपी'ला सादर करण्यात येईल.'' 

Web Title: New Municipal building safe