द्रुतगतीवर नव्या दराने टोलवसुली 

द्रुतगतीवर नव्या दराने टोलवसुली 

लोणावळा  - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नवीन दरवाढ लागू झाल्याने प्रवास आता महागला आहे. रस्ते विकास महामंडळाने गेल्या महिन्यात मोठी दरवाढ जाहीर केली होती. त्याचे नवीन दर 1 एप्रिलपासून प्रस्तावित केले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य खासगी वाहतुकीस बंदी घालण्यात आल्याने वीस एप्रिलपर्यंत वाहनांसाठी टोल रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे सोमवारपासून (ता. 20) दरवाढीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, नवीन दराने टोलवसुली सुरू आहे. 

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सध्या रस्त्यांवर वाहनांची फारशी वर्दळ नाही. मात्र, लॉकडाउन संपल्यानंतर वाहन चालकांना द्रुतगतीवरील नवीन दरवाढीचा "शॉक' बसणार आहे. टोलवसुलीसह महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट पुन्हा एकदा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीकडे आले आहे. नव्या नियमानुसार हलक्‍या मोटारींच्या टोलमध्ये चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला पुढील पंधरा वर्षांसाठी टोलवसुलीचे अधिकार दिले आहेत. नव्या करारानुसार त्यांच्याकडून आठ हजार 262 कोटी रुपये रस्ते विकास महामंडळास मिळणार आहे.

वाहनांचा प्रकार जुने टोल नवीन टोल 
हलकी वाहने 230 270 
मिनीबस 355 420 
ट्रक, अवजड वाहने 493 580 
बस 675 797 
मल्टी ऍक्‍सल 1555 1835 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com