गुडघेदुखी व वातावर जागतिक पातळीवर संशोधन - डॉ. कीर्ती पवार

मिलिंद संगई
शुक्रवार, 18 मे 2018

बारामती (पुणे) : शस्त्रक्रीयेविना गुडघेदुखी व वातावर उपचारासाठी जागतिक पातळीवर वेगाने संशोधन सुरु आहे, वेदनाविरहीत उपचार पद्धतींना जागतिक स्तरावर मागणी असून त्या दृष्टीने वैद्यकीय शास्त्र वेगाने वाटचाल करत आहे, अशी माहिती बारामतीच्या वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती पवार यांनी दिली. 

इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कॉंग्रेस ऑन ऑस्टिओआरथ्रायटीस या गुडघेदुखी व वात या वरील जागतिक परिषदेस कीर्ती पवार उपस्थित राहिल्या. जगभरातून 1500 डॉक्टर्स या परिषदेस उपस्थित होते. गुडघेदुखी व वात या वर मुलभूत संशोधन व उपाययोजना हा या परिषदेचा विषय होता. 

भारतासह इतरही विकसनशील देशांमध्ये ज्यांना गुडघेदुखीवर शस्त्रक्रीयांची गरज आहे मात्र त्यांची आर्थिक स्थिती नाही, अशा रुग्णांना वेदनारहित व शस्त्रक्रीयाविना उपाय कसे करता येतील या बाबत संशोधन सुरु आहे. डॉ. कीर्ती पवार याही असे वेदनारहीत उपचार व दीर्घकालीन दुष्परिणाम होणार नाही या दृष्टीने या बाबत संशोधन करीत आहे. या परिषदेत जगभरातील नामांकीत डॉक्टरांनी आपापले अनुभव कथन करताना या बाबतीतील नव्या घडामोडींचीही माहिती दिल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: new research on knee pain and Arthritis on global level says dr kirti pawar