प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नवी सांगवी - खासगी प्रवासी मोटारचालकासह प्रवाशांची लुटमार करणाऱ्या टोळीला सांगवी पोलिसांनी अटक केली. लुटमारीनंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला आहे.

नवी सांगवी - खासगी प्रवासी मोटारचालकासह प्रवाशांची लुटमार करणाऱ्या टोळीला सांगवी पोलिसांनी अटक केली. लुटमारीनंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला आहे.

सचिन गोवर्धन गुंजकर (वय 20, रा. डुडुळगाव), गणेश अशोक घोलप (वय 24, रा. विठ्ठलवाडी, ता. मावळ) आणि रूपेश अच्युतराव मैंदाड (वय 27, रा. चिखली), अशी त्यांची नावे आहेत. नारायण सुर्वे यांनी पोलिसांत फिर्याद दिली, अशी माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

पोलिस उपायुक्त शिंदे यांनी शनिवारी ( ता. 30) घडलेल्या प्रकाराची माहिती पत्रकार परिषदेत दिली. फिर्यादी सुर्वे हे मोटारीतून प्रवाशांना घेऊन वल्लभनगरला निघाले होते. मोटारीतून आलेल्या आरोपींनी सुर्वे यांची मोटार पिंपळे सौदागरला अडविली. प्रवाशांसह दोन्ही गाड्या घेऊन ते पळून गेले व भोसरी, निगडी भागात फिरत होते. त्या वेळी आरोपींनी सुर्वे यांना एटीएममधून पैसे काढून आणण्यास सांगितले; परंतु सुर्वे यांनी एमआयडीसी पोलिस चौकीत धाव घेतली व फिर्याद दिली. त्याच वेळी गाडीतील प्रवाशांकडचे साठ हजार एटीएममधून काढून आरोपी पसार झाले होते. आरोपींकडून दोन मोबाईल, दोन मोटारी, दुचाकी व चोवीस हजारांची रोख रोकड, असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननवरे, उपनिरीक्षक अमित शेटे यांच्यासह पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेऊन तीन दिवसांत या गुन्हाचा छडा लावला.

Web Title: new sangavi pune news criminal gang arrested