अपघात टाळण्यासाठी एनआयबीएम कंपनी समोर नवीन सिग्नल

संदीप जगदाळे
शनिवार, 19 मे 2018

हडपसर- ब्लॅक स्पॅाट म्हणून ओळखल्या जाणा-या सासवड रस्त्यावरील एनआयबीएम कंपनीसमोर गेल्या वर्षभरात ११ वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून एसपी इन्फो कंपनीने याठिकाणी सिग्नल बसविण्यासाठी मागणी केली होती. तसेच यासाठी सहकार्य देखील केल्याने अपघाताचे व वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल, असे मत वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त अशोक मोराळे यांनी व्यक्त केले.

एनआयबीएम कंपनी समोरील नव्याने बसविण्यात आलेल्या सिग्नलचे उदघाटन मोराळे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त देविदास पाटील, हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर, दिलीप जोसेफ, विश्वनाथ पाटील, व्हिक्टर डेव्हीड, अमरेंद्र सिंग, पी. के. विश्वनाथ उपस्थित होते

कळसकर म्हणाले, एसपी इन्फो कंपनीच्यावतीने सिग्नल बसविण्या बरोबरच सासवड रस्त्यावर ४०० मिटर अंतराचा दुभाजक बसविण्यात येणार आहे. यासाठी नॅशनल हायवेकडून नाहरकत दाखला मिळाला आहे. या दोन्ही कामांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच अपघात कमी होतील. बेशिस्तपणे घुसखोरी करणा-या वाहनचालकांना लगाम बसेल तसेच पादचा-यांना सुखरूपणे रस्ता ओलांडता येईल.

Web Title: New signal to NIBM company to avoid accidents