नवे ‘सकस’ स्टार्टअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवे ‘सकस’ स्टार्टअप

साताऱ्यावरून पुण्याकडे येत असताना प्रवासात मुलांकडून वारंवार वेफर्स‌, कुरकुरे, चिलिमिली यांसारख्या जंक फूडचा आग्रह धरल्यामुळे आईला चिंता वाटत होती.

नवे ‘सकस’ स्टार्टअप

पुणे - साताऱ्यावरून पुण्याकडे येत असताना प्रवासात मुलांकडून वारंवार वेफर्स‌, कुरकुरे, चिलिमिली यांसारख्या जंक फूडचा आग्रह धरल्यामुळे आईला चिंता वाटत होती. अखेरीस नाइलाजाने तिने त्यांना ते घेऊन दिले. आरोग्यास हानिकारक असलेल्या अशा जंक फूडला एखादा हेल्दी पर्याय नसावा का, असा विचार तिच्या मनात आला अन् त्यातूनच कंपनीचा प्रवास सुरू झाला आणि आज तंदुरुस्तीबाबत जागरूक असलेल्यांसाठी हेल्दी स्नॅक्स उपलब्ध झाले.

पालकांसमोरील प्रश्न

जंक फूड आणि फास्ट फूडपासून मुलांना दूर कसे ठेवता येईल, असा प्रश्‍न माझ्यासारख्या सर्व पालकांसमोर उभा असणार, हे लक्षात आले. बाजारात फिरून त्याचा शोध घेतला, परंतु पर्याय मिळाला नाही. मग स्वत:च पर्याय काढण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे सोनिया व त्यांचे पती पियुष रायसोनी सांगत होते. या प्रश्‍नातूनच मिल्टन नमकिन यांसारख्या हेल्दी स्नॅक्सचा विचार पुढे आला. सुरवातीला घरात, नंतर मित्रमैत्रिणींकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बाजारात ते स्नॅक्स आणले. लवकरच आणखी पाच हेल्दी पदार्थ बाजारात येणार आहेत. आमची फुलगाव येथे मायव्ही फूड्स प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी आहे. जगातील सर्वोच्च गुणवत्तेचे प्रमाण असलेल्या अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचीही मोहेार यावर उमटली आहे.

कसे बनवितात पदार्थ

  • वनस्पती बिया आणि पारंपरिक धान्यांपासून स्नॅक्स पदार्थांवर भर

  • पोषक तत्त्वांनी भरपूर चटपटीत, चमचमीत, परंतु न तळता केवळ भाजून बनविलेले वेगवेगळे फ्लेवर.

जंक फूडचे तोटे

चटपटीत, मसालेदार आणि बेकरीचे पदार्थ सातत्याने खाल्ल्याने मुलांचे वजन वाढणे, लठ्ठपणा, लहान वयात मधुमेहाचा त्रास सुरू होणे आदी आजार बळावतात.

कोणते पदार्थ बाजारात

बिहारमधील कमळाच्या बियांपासून ‘रोस्ट’ या नावाने बनविलेले मखाना, ज्वारीपासून बनलेले जवार पफ, नाचणी, बाजरी, ओटस्‌ व राजगिरा अशा वेगवेगळ्या धान्यापासून बनविलेले मिल्टन नमकिन

कुठे होते विक्री?

अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, कुवेत, बहरिन आणि इंग्लंडसह भारतातील २५ शहरांत