पूर्व हवेलीसाठी लवकरच स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय : थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब थोरात

पूर्व हवेलीसाठी लवकरच स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय : थोरात

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्याची लोकसंख्या व अधिकाऱ्यांच्यावर असलेला कामाचा बोजा लक्षात घेता, लोणी काळभोर, उरुळी कांचन, लोणी कंदसह पूर्व हवेलीसाठी लवकरच स्वतंत्र अप्पर तहसीलदार सुरु कार्यालय होणार असल्याची माहिती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सोमवारी (ता. 14) विधानसभेत माहिती दिली.

लोणी काळभोर, उरुळी कांचन, लोणी कंदसह पूर्व हवेलीमधील नागरीकांच्या महसूल विषयक कामांना सध्या लागत विलंब लक्षात घेऊन, आमदार अँड. अशोक पवार यांनी पुर्व हवेलीसाठी स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातुन विधानसभेत केली होती. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुर्व हवेलीसाठी स्तंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय लवकरात लवकर सुरु करणार असल्याची माहिती विधानसभेत दिली.

हेही वाचा: The Kashmir Files: बत्तीस वर्षांपासून दाटलेल्या हुंदक्याला वाट मिळाली

हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेशअसून जवळजवळ ४० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. दैनंदिन वाढते विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास पाहता तालुक्यासाठी सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेली प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी पडत आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यासाठी शहरी व ग्रामीण भागाला मिळून एकच तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषि अधिकारी असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार, पुरवठाविषयक कामे, विविध परवानग्या, दाखले, नैसर्गिक आपत्ती, कायदा सुव्यवस्था, बैठका, नियोजन, न्यायालयीन कामकाज इत्यादी महत्वाच्या कामांमधील विलंब होत आहे. या अडचणींमुळे जनतेच्या विकास कामांवर परिणाम होत आहे. वरील बाबी लक्षात घेऊऩ आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत वरील मागणी केली होती.

याबाबत अधिक माहिती देतांना आमदार पवार म्हणाले,

हवेली तहसिल कार्यालयात दैनंदीन कामकाज संदर्भात दर महिन्याला साधारणत: ७ ते ८ हजार विविध अर्ज प्राप्त होतात. तर शिक्षा पत्रिका मिळणेसाठी दरमहा साधारणत: ४०० ते ५०० प्राप्त होतात. हवेली तहसिल कार्यालय नागरीक सुविधा केंद्रातर्फे दरमहा विविध प्रकारचे साधारणत: ६००० दाखले दिले जातात. त्याव्यतिरिक्त जमीन मागणी बाबत विविध व्यक्ती व संस्थांची प्रकरणे, जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदी, विविध प्रकारच्या परवानग्या, तदनुषंगिक दावे, न्यायालयीन प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती, पुरवठा विषयक कामकाज, नियोजन व कार्यवाहीबाबत बैठका, निवडणूक कामकाज, जनगणना विषयक कामकाज इत्यादी कामकाज तहसिलदार हवेली यांना पहावे लागते. वाढती लोकसंख्या नागरीकरण, शहरीकरण इ. बाबी विचारात घेता परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अपर तहसिल कार्यालय स्थापन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

हेही वाचा: कच्छच्या रणातल्या सैबेरीयन चित्रबलाक पक्ष्यांचे इंदापूरात सारंगगार

आमदार अशोक पवार पुढे म्हणाले, राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या लोकसंख्येसाठी उपलब्ध असलेल्या तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषि अधिकारी व इतर खात्यांचे अधिकारी यांची तुलनात्मक संख्या पाहता हवेली तालुक्यात तोकड्या व अन्य प्रशासकीय यंत्रणेमुळे नागरिकांवर प्रचंड अन्याय होत आहे. सद्या वस्तुस्थिती पाहता हवेली तहसिल कार्यालयाचे विभाजन करुन हवेलीसाठी स्वतंत्र नविन तहसिल कार्यालय स्थापन करण्यात यावे. आणि तेथे स्वतंत्र तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषि अधिकान्यांची पदे वाढवावीत. आणि तालुक्यातील विकास कामांची गती वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी आमदार अँड. अशोक पवार यांनी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी केली होती. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवेलीसाठी अप्पर तहसीलदार कार्यालय लवकर होणार असल्याची माहिती विधानसभेत दिली.

दरम्यान, हवेली तालुक्यातील वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे शासन निर्णयान्वये हवेली तालुक्यांतर्गत अपर तहसिलदार कार्यालय, पिंपरी-चिंचवड स्थापन करण्यास यापूर्वी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुळ हवेली तहसिल कार्यालय व अपर तहसिल कार्यालय, पिंपरी चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरू आहे. हवेली तालुक्यातील एकूण १० महसूली मंडळ आहेत. आणि आकृतीबंधानुसार त्या मंडळापैकी ८ महसूली मंडळांसाठी १ तहसिलदार व २ महसूली मंडळांसाठी १ अपर तहसिलदार पद मंजूर आहे. तसेच तहसिलदार संजय गांधी योजना हे पद हवेली तालुक्यासाठी मंजुर व कार्यरत आहे.

Web Title: New Tehsil Office For Loni Kalbhor And Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsLoni Kalbhor
go to top