पुणे : कर्वे रस्त्यावर आता वाहतुकीचा नवा नियम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे : म्हात्रे पूल, मेहेंदळे गॅरेज, निसर्ग हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या वाहनांना पाडळे पॅलेस चौकाऐवजी नळस्टॉप चौकातून वळून गरवारे महाविद्यालय, सेंट्रल मॉल, नवी पेठ किंवा डेक्कन परिसरात जाता येईल. हा बदल प्रायोगिक स्वरूपात असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. 27) होणार आहे. 

खडकवासला धरणातून विसर्ग वाढविल्याने रजपूत झोपडपट्टी ते डेक्कनदरम्यानच्या नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. त्यातच कर्वे रस्त्यावर मेट्रो पुलाचे काम सुरू आहे. या दोन्ही कारणांमुळे म्हात्रे पूल, मेहेंदळे गॅरेज, पाडळे पॅलेसपासून ते नळस्टॉपपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर सोमवारपासून येथील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यासाठी वाहतूक शाखेतील सहायक आयुक्त प्रभाकर ढमाले, नगरसेवक मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, दीपक पोटे, जयंत भावे, पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, महापालिकेच्या पथविभागाचे मुकुंद शिंदे, राजेश फटाले, भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी नुकतीच पाहणी करून बदलाची अंमलबजावणी कशी करायची, याचे नियोजन केले. 

वाहनचालकांनी पाडळे पॅलेस चौकातून वळण्याऐवजी नळस्टॉप येथून वळून खिलारेवाडी, सेंट्रल मॉल व गरवारे कॉलेजकडे जाता येईल. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होईल. 
- प्रभाकर ढमाले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा 

Web Title: New traffic rules to be implemented on Karve Road in Pune