नव्या रेल्वे गाड्या वापराविना यार्डातच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

प्रवासी आहेत, जागा आहे अन्‌ रेल्वेचे नवे डबेही...परंतु, लालफितीत याबाबतचा आदेश अडकल्यामुळे तीन नव्या रेल्वे गाड्या दोन महिन्यांपासून खडकी रेल्वे स्थानकावर विनावापर उभ्या आहेत. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतचा आदेश अद्याप मिळाला नाही, असे कारण रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पुणे - प्रवासी आहेत, जागा आहे अन्‌ रेल्वेचे नवे डबेही...परंतु, लालफितीत याबाबतचा आदेश अडकल्यामुळे तीन नव्या रेल्वे गाड्या दोन महिन्यांपासून खडकी रेल्वे स्थानकावर विनावापर उभ्या आहेत. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतचा आदेश अद्याप मिळाला नाही, असे कारण रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लांबपल्ल्याच्या मार्गांवर जाऊ शकतील, अशा १६ डब्यांच्या तीन नव्या गाड्या पुण्यात आल्या आहेत. दिल्ली, दरभंगा आदी मार्गांवर प्रवास करण्यासाठी शहरातून प्रवाशांची संख्या मोठी असते. त्या तुलनेत रेल्वेच्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे सध्या तीन गाड्या आल्या आहेत. पाठोपाठ आणखी काही नव्या गाड्या पुण्यात येणार आहेत. दिल्लीसाठी भोपाळमार्गे, तसेच चंडीगड, दरभंगासाठी गाड्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. या मार्गांवर या नव्या रेल्वे गाड्या सुरू करता येतील अथवा जुन्या गाड्यांच्या जागी बदलता येतील, असे नियोजन पुणे विभागाने केले आहे; परंतु त्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी आवश्‍यक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती मिळालेली नाही. 

सुट्यांच्या हंगामात गर्दीच्या मार्गावर या नव्या गाड्यांचा वापर विशेष गाडी म्हणून करता येईल. त्यातून अधिक उत्पन्नही मिळू शकेल, असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा होरा होता. मात्र, पुणे विभागात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे ही गाडी सोडता आलेली नाही. पुणे रेल्वे स्थानकावरून नव्या गाड्या सोडणे आता अवघड झाले आहे. त्यामुळे हडपसर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यावरच नव्या गाड्यांबाबतचे नियोजन करता येईल, असे पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. 

गाड्या लवकरच वापरात अाणणार - झंवर
पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, ‘‘एक गाडी रेल्वेच्या अन्य विभागाला द्यायची आहे. एक गाडी नव्याने घडविण्यात आली आहे, तर तिसऱ्या गाडीबाबतही तसेच आहे. या गाड्या लवकरच वापरात येतील. पुण्यातून नवी गाडी सुरू करता येईल, अशी परिस्थिती सध्या नाही. पुणे रेल्वे स्थानकाचे रिमॉडेलिंग झाल्यावरच पुण्यातून नव्या गाड्या सोडता येतील.’’  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New trains in yard

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: