एक्स्प्रेस हायवेवरच्या कोंडीला मिळणार फुलस्टॉप; 'या' ठिकाणी होतोय नवा बोगदा!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पिंपरी  : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत छोट्या वाहने अडकतात. त्यावर उपाय म्हणून लोणावळा ते खोपोली दरम्यान केवळ जड वाहनांसाठी भुयारी मार्ग (मिसिंग लिंक) करण्यात येत आहे. याचे काम सध्या वेगात सुरू असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल. परिणामी, लहान वाहनांच्या प्रवासाचा अर्धा तास वाचेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोणावळ्याजवळील डोंगरगाव परिसरात या कामाला ऑगस्टमध्ये सुरुवात झाली. जमिनीखाली 100 फुटांवर हे काम सुरू आहे. आतापर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 700 मीटर तर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर 200 मीटर काम झाले आहे. या कामाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये द्रुतगतीला जोडण्यासाठी सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल. त्यानंतर तो वळविण्यात येईल. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागतील. रस्ते विकास महामंडळाने हे काम नवयोगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड आणि ऍमकॉन या कंपन्यांकडे दिले आहे. 

Image may contain: sky, outdoor, nature and water

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • मिसिंग लिंकच्या कामाचा खर्च ः 6500 कोटी रुपये 
  • लोणावळा ते खोपोली दरम्यानचे अंतर ः 10 किलोमीटर 

काय आहे मिसिंग लिंक? 
द्रुतगती मार्गावरून ये-जा करणाऱ्या जड वाहनांसाठीचा हा रस्ता चार पदरी असेल. वाहनांना बाहेर जाण्यासाठी मिसिंग लिंकमध्ये प्रत्येकी 300 मीटर अंतरावर एक्‍झिट असेल. लोणावळा ते खोपोली दरम्यान बोगदा असल्यामुळे अमृतांजन पुलाजवळील परिसर हलक्‍या वाहनांसाठी मोकळा राहील. जड वाहनांमुळे द्रुतगती महामार्गावर रात्री वाहतूक कोंडी होते. याखेरीज मिसिंग लिंकमुळे घाटामध्ये होणारे जड वाहनांचे अपघात थांबतील. 

Image may contain: one or more people and outdoor

द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक तयार करण्याचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या हे काम वेगात सुरू आहे. 
- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new tunnel work at mumbai pune expressway will reduce traffic jams