अत्युच्च मानांकन मिळवण्याचा संकल्प! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - ""सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अत्युच्च मानांकन मिळवून देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची प्रतिमा आणखी उंचाविण्यासाठी माझा कार्यकाळ समर्पित करीन. यापुढील काळात हे विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठीच राहील,'' अशी भावना नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

डॉ. करमळकर यांची विद्यीपीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याची बातमी समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पर्यावरणशास्र विभागातील त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांना आनंद व्यक्त केला. डॉ. करमळकर तीनच्या सुमारास विभागात आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. कुलगुरू म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. करमळकर यांनी आनंद व्यक्त केला. "सकाळ'च्या "फेसबुक लाइव्ह'ला त्यांनी मुलाखत दिली. 

""विद्यापीठाच्या नावलौकिकात मोठी भर घालण्याचा प्रयत्न असेल. विद्यापीठात असलेल्या त्रुटी भरून काढण्याबरोबरच पाच वर्षांचा कारभार हा विद्यार्थिभिमुख असेल. विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषत: विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागातून विद्यापीठाला अत्युच्च मानांकन मिळवू,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची जाणीव 
परीक्षा असो की प्रवेश, विद्यापीठात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या सोडविण्यासाठी कुलगुरू म्हणून काय करणार, या प्रश्‍नावर डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ""पुणे विद्यापीठाचाच मी विद्यार्थी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना काय असतात. त्यांना कोणता संघर्ष करावा लागतो, याची जाणीव मला आहे. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांचेच राहील, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम केले जाईल.'' 

Web Title: New Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar