सुविधा देण्याआधीच महसुलावर भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे - नव्या गावांमध्ये सेवासुविधा पुरविण्याचे नियोजन अजूनही कागदोपत्री असले, तरी या गावांमधील महसूलवाढीवर महापालिकेचा भर राहणार आहे. या अकरा गावांमध्ये सुमारे पाचशे अधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) उभारण्याचे महापालिकेने निश्‍चित केले असून, त्यातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षाकाठी दीडशे कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. या संदर्भात नव्याने आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट  केले. 

महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती करण्यात येणार असून, त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. तसेच गावांमधील नेमकी कामे जाणून घेण्यासाठी येत्या गुरुवारी 

(ता. ५) महापालिकेतील पदाधिकारी, गावांमधील सरपंच, उपसरपंच आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात ग्रामपंचायतींनी आखलेली; मात्र सध्या रखडलेली विकासकामे वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. दुसरीकडे मात्र या गावांमधून अधिक महसूल मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. काही गावांमधील बांधकाम क्षेत्र आणि अन्य स्वरूपाच्या बाजारपेठा लक्षात घेऊन जाहिरात फलक (होर्डिंग) उभारण्याचे नियोजन केले आहे. तेथील रस्ते, चौक आणि बाजारपेठांच्या भागात पाचशे ठिकाणी जाहिरात फलक उभारता येणे शक्‍य असल्याचे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात साधारणतः शंभर कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहराच्या सर्व भागात पाहणी करून जाहिरात फलकांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यादरम्यान, नव्या गावांची पाहणी केली असून, तेथे फलकांना मागणी आहे. त्यामुळे ठिकाणे निश्‍चित करून फलक उभारण्याला अधिकृत परवानगी दिली जाईल. त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे.
- तुषार दौंडकर, आकाशचिन्ह व परवाना विभागाचे प्रमुख

Web Title: new villages revenue will be increased pmc